Marathi Movie Investment – मराठी चित्रपट इन्वेस्टमेंट
सुहास शिरवळकर लिखित दुनियादारी, अशोक व्हटकर लिखित ७२ मैल या कादंबर्यांवर आधारित दुनियादारी आणि ७२ मैल एक प्रवास या यशस्वी चित्रपटां नंतर रत्नाकर मतकरी यांनी लिहीलेल्या इन्वेस्टमेंट या कथेवर आधारित ‘इन्वेस्टमेंट’ हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे.
प्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि नाटककार रत्नाकर मतकरी यांनी दिग्दर्शित केलेला इन्वेस्टमेंट हा पहिलाच चित्रपट. याच चित्रपटाला २०१२ सालचा सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
दिग्दर्शक: रत्नाकर मतकरी
सह-दिग्दर्शक: गणेश मतकरी
कलाकार: तुषार दळवी, सुप्रिया विनोद, सुलभा देशपांडे, संजय मोने, संदीप पाठक, प्रहर्ष नाईक.
लेखक: रत्नाकर मतकरी – इन्वेस्टमेंट या कथेवर आधारित
इन्वेस्टमेंट ही कथा आशिष घोरपडे आणि प्राची घोरपडे या तरुण शहरी पालकांची कथा आहे. आजच्या काळातील प्रत्येकाची करियर घडवण्यासाठी जशी धावपळ होत असते तशीच या दोघांची . आशीषची धडपड चालू आहे ती नवीन नोकरी मिळवून अमेरिकेत स्थलांतरित होण्यासाठी.
सोहेल हा त्यांचा १२ वर्षीय मुलगा. सोहेलने मोठे होऊन राजकारणी बनावे असे दोघांचे स्वप्न असते. आशीषच्या ” हवे ते मिळवण्या” चा सोहेलच्या जीवनावर काय प्रभाव पडतो? त्यातून सोहेलच्या हातून असा काय गुन्हा घडतो? त्याला आशीष आणि प्राची कसे सामोरे जातात? अशी वास्तववादी आणि रहस्यमय कथा रसिकांना इन्वेस्टमेंट मध्ये अनुभवास मिळणार आहे.
चित्रपटाची निर्मिती प्रतिभा मतकरी यांच्या महाद्वार प्रॉडक्शन आणि अनिश जोशी आणि मंदार वैद्य यांच्या इंदू प्रॉडक्शन यांनी एकत्रित पणे केली आहे.
रत्नाकर मतकरी दिग्दर्शित इन्वेस्टमेंट चित्रपट पहा आपल्या नजीकच्या चित्रपटगृहामध्ये २० सप्टेंबर २०१३ रोजी.
इन्वेस्टमेंट चित्रपटाविषयी श्रेयस तळपदे यांचे मत.
[tube]1TVD3Z5ufEo[/tube]
सुप्रिया विनोद यांचे मत.
[tube]pgQDu65ZoOc[/tube]
चित्रपटाचा ट्रेलर…
[tube]JtRE0H9CpZM[/tube]
[tube]stHwYaj33ZI[/tube]
इन्वेस्टमेंट चित्रपटा विषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी भेट द्या .
फेसबुकवर इन्वेस्टमेंट चित्रपटाला लाइक करायला भेट द्या.