Marathi Movie Duniyadari Review – दुनियादारी चित्रपट परीक्षण

1
Posted July 27, 2013 by Swapnil Samel in रोमांचक
marathi movie duniyadari review

Rating

कथा/पटकथा
 
 
 
 
 


दिग्दर्शन
 
 
 
 
 


संगीत/पार्श्वसंगीत
 
 
 
 
 


अभिनय
 
 
 
 
 


Total Score
 
 
 
 
 


निर्माता: Dreaming 24/7
 
दिग्दर्शक: संजय जाधव
 
संगीत: अजय-समीर
 
कलाकार: स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, सुशांत शेलार, उर्मिला कानिटकर, वर्षा उसगावकर, संदीप कुलकर्णी, उदय टीकेकर, उदय सबनीस
 
कथा कल्पना: सुहास शिरवळकरांच्या दुनियादारी कादंबरीवर आधारित पटकथा - चिन्मय मांडलेकर आणि संजय जाधव
 
प्रदर्शन दिनांक: १९ जुलै २०१३
 
वर्ग:
 
निर्मिती:
 

का पाहावा?:

उत्तम गाणी, उत्तम कथा, उत्तम अभिनय, उत्तम दिग्दर्शन, उत्तम संगीत .. प्रेत्येकाने पाहावा असा चित्रपट.
 

का पाहू नये?:

अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी कॉलेज स्टुडेंट वाटत नाही... पर चलता है... चित्रपट उत्तम आहे
 
थोडक्यात

मराठीबोली वरील लेख ईमेल द्वारे मिळवण्यासाठी ईमेल आयडी द्या. Marathi Movie Duniyadari Review – दुनियादारी चित्रपट परीक्षण सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी‘ या कादंबरीवर आधारित संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी‘ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि आजही हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवतोय. या चित्रपटाच्या प्रेक्षक वर्गात दोन वर्ग पाहता येतील, एक म्हणजे ज्यांनी दुनियादारी ही कादंबरी वाचली नाही आणि दूसरा […]

by Swapnil Samel
Full Article

मराठीबोली वरील लेख ईमेल द्वारे मिळवण्यासाठी ईमेल आयडी द्या.

Marathi Movie Duniyadari Review – दुनियादारी चित्रपट परीक्षण

duniyadari---review

सुहास शिरवळकरांच्या ‘दुनियादारी‘ या कादंबरीवर आधारित संजय जाधव दिग्दर्शित ‘दुनियादारी‘ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आणि आजही हाऊसफुल्लचा बोर्ड झळकवतोय.

marathi movie duniyadari review

या चित्रपटाच्या प्रेक्षक वर्गात दोन वर्ग पाहता येतील, एक म्हणजे ज्यांनी दुनियादारी ही कादंबरी वाचली नाही आणि दूसरा म्हणजे जे या कादंबरीच्या प्रेमात आजही आहेत.

जर आपण दुनियादारी कादंबरी वाचली नसेल. तर हा चित्रपट आपल्यासाठी एक सुखद अनुभव असेल, आज वर पाहिलेल्या अनेक चित्रपटांपैकी लक्ष्यात ठेवण्यासारखा चित्रपट. पण जर आपण ही कादंबरी वाचली असेल तर कदाचित हा चित्रपट आपला भ्रमनिरास करेल, कारण चित्रपटाची कथा लिहिताना चिन्मय मांडलेकर यांनी खूप स्वातंत्र्य घेतले आहे. तरीही यात संजय जाधव किंवा चिन्मय मांडलेकर यांचा काहीच दोष नाही. कारण सुहास शिरवळकरांची ही कादंबरी एका ३ तासांच्या चित्रपटात बसवणे खरच अशक्य आहे. कादंबरीतील व्यक्तिरेखाना तेवढेच महत्व चित्रपटात मिळत नाही. चित्रपट मुख्यत्वे श्रेयस(स्वप्नील जोशी), डीएसपी म्हणजेच दिगंबर शंकर पाटील(अंकुश चौधरी), शिरीन(सई ताम्हणकर), साई(जितेंद्र जोशी). मिनू(उर्मिला कानीटकर) या व्यक्तिरेखां भोवती फिरतो.

चित्रपटाची सुरुवात आजच्या काळात सुरू होते आणि कथा १९७० च्या भूतकाळात घेऊन जाते. १९७० सालातील कॉलेज च्या गमती जमती, कट्टा, कट्ट्यावरचे प्रेम, भांडणे ही आजही तशीच प्रत्येक कॉलेजमध्ये होत आहेत म्हणून हा चित्रपट लगेजच प्रेक्षकांना त्यांच्या आठवणीत घेऊन जातो. चित्रपटच्या मध्यान्ना पर्यन्त ही कॉलेज ची गम्मत अनुभवायला मिळते आणि नंतर सुरू होतो खेळ मध्यान्नापर्यन्त गुंतलेल्या धाग्यांना सोडवण्याचा. अनेक अनपेक्षित घटना घडत जातात आणि चित्रपट संपतो.

इथे मला माझा स्वताचा अनुभव सांगावासा वाटतो, जेव्हा चित्रपट संपतो तेव्हा बाहेर पडताना संपूर्ण चित्रपटगृह शांत असते. चित्रपटच्या कथेतून लगेच बाहेर येणे कोणालाच जमत नाही.

चित्रपटात ४ गाणी आहेत आणि चारही गाणी उत्तम आहेत, योग्य त्या ठिकाणी आहेत, आणि एकही गाणे कंटाळा येऊ देत नाही किंवा काठे पासून भरकवट नेत नाही. संजय जाधव यांनी उत्तम दिग्दर्शन केले आहे. त्यांनी पटकथा बनवताना मूळ कथेत अनेक बदल केले, पण ते चित्रपटच्या सादरी कारणासाठी गरजेचे होते. आणि मला तरी प्रामाणिक पाने असे वाटते सुहास शिरवळकरांच्या दुनियादारीला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न दुनियादारी टीम ने नक्कीच केला आहे.

दुनियादारी टीम वरुन आठवले, चित्रपट संपल्या नंतर येणारे “FILM BY TEAM DUNIYADARI” . संजय जाधव यांनी संपूर्ण दुनियादारी टीम ला चित्रपटाचे श्रेय दिले आहे.

चित्रपटातील कलाकारांचा अभिनय उत्तमच, स्वप्नीलने  थोडे वजन नक्कीच कमी करायला हवे होते. सर्व सहकलाकारांनी उत्तम सहकार्य केले आहे. तर जितेंद्र जोशीने रंगवलेला साई मस्तच, खरोखर सुंदर भूमिका केली आहे.

marathi movie duniyadari review

स्वप्नील आणि सईची जोडी खूप छान दिसते.

marathi movie duniyadari review

मी कथेविषयी मुद्दामच काहीच लिहिले नाही, कारण हा चित्रपट प्रत्येकानी चित्रपटगृहात जाऊन पाहण्या सारखाच चित्रपट आहे. संपूर्ण कुटुंबासोबत  पहा दुनियादारी

..

 


About the Author

Swapnil Samel


One Comment


  1.  Leave a Response

(required)