Marathi Movie Fandry – “फॅन्ड्री” निघाला लंडनला

0
3500
Marathi Movie Fandry – “फॅन्ड्री” निघाला लंडनला
Marathi Movie Fandry
सगळ्याच कलाकृती आपापले नशीब घेऊन येत असतात, परंतु नुसती कलाकृती उत्तम असून चालत नाही तर ती ” उत्तम” आहे हे पटवून देण्यासाठी योग्य माणसं , योग्य निर्मितीसंस्था , योग्य वितरक या सगळ्याचीच भट्टी जमून यावी लागते. “फॅन्ड्री या आगामी सिनेमाची भट्टी अशीच काहीशी जमून आली आहे असे म्हणायला  हरकत नाही.
नागराज मंजुळे लिखित -दिग्दर्शित, नवलखा आर्ट्स मिडिया एंन्टरटेनमेंट आणि होली बेसिल प्रॉडक्शनसची प्रस्तुती असलेल्या “फॅन्ड्री” या सिनेमाच्या वितरणाचे आणि  सॅटेलाईटचे सर्व हक्क झी टीव्हीने घेतले आहेत. हा आनंदाचा क्षण साजरा करत असतानाच “फॅन्ड्री” च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे.
‘ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट चा ५७ व्या लंडन फिल्म फेस्टिवलसाठी “फॅन्ड्री” ची निवड झाली आहे. हा मानाचा पुरस्कार ९ ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. “फॅन्ड्री”च्या प्रदर्शनाआधीच या सिनेमाची घौडदौड यशस्वीरीत्या सुरु झाली आहे असे म्हणायला हरकत नाही.

“फॅन्ड्री” ची निर्मिती  नवलखा आर्ट्स मिडिया एंन्टरटेनमेंट आणि होली बेसिल प्रॉडक्शनसने केली असून ही निर्मिती संस्था राष्ट्रीय पारितोषिक विजेती संस्था आहे. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून याआधी त्यांनी बनविलेल्या  “पिस्तुल्या” या ‘शॉर्ट फिल्मला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here