Marathi Movie Dr. Prakash Baba Amte – डॉ. प्रकाश बाबा आमटे
“डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रीयल हीरो” हा मराठी चित्रपट डॉ. प्रकाश आमटे यांचे चरित्र चित्रणच म्हणावे लागेल, हेमलकसातील आदिवासिना मुख्य प्रवाहात आणणे हे बाबा आमटे यांचे स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी आपले पूर्ण आयुष्य वाहणारे डॉ. प्रकाश बाबा आमटे.. द रीयल हीरो..
हेमलकसा, गडचिरोली जिल्ह्यातील एक डोंगराळ भाग, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी डॉक्टर असलेले प्रकाश आमटे आणि त्यांच्या डॉक्टर पत्नी मंदाकिनी आमटे या शहरातील आपले सुखी जीवन सोडून आपल्या सहकार्याँ समवेत हेमलकसामध्ये येतात त्यांची ही कथा..
१९७३ साली जेव्हा हेमलकसा मध्ये लोकबीरादरी प्रकल्प सुरू झाला तेव्हा येथील आदिवासी हे भूक, रोगराई आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेला होता. त्यात भर म्हणून पोलिसांचा त्यांच्यावर होणारा अत्याचार . परिस्थितीमुळे नक्षलवादा कडे वळलेले आदिवासी… अश्या हेमलकसामध्ये प्रकाश बाबा आमटे आपली पत्नी आणि इतर सहकार्यांच्या मदतीने लोकबिरादरी प्रकल्पाची सुरुवात करतात. पकल्प सुरू करताना आणि तो पुढे चालवताना त्यांना अनेक अडचणी येतात .. ज्या हेमलकसातील आदिवासिना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आमटे करत असतात सुरुवातील त्यांची भाषाच त्यांना कळत नसते… अश्या अनेक अडचणींवर मात करत… डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी आपल्या इच्छा शक्तीच्या आणि जिद्धीच्या जोरावर हेमलकसामध्ये ज्ञानाचे नंदनवन फुलवले.
मला आई व्हायचय या चित्रपटासाठी राष्ट्रीय परितोषिक मिळालेल्या अॅड. समृद्धी पोरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटची कथा ही या चित्रपटाचा मूळ गाभा असली तरीही नाना पाटेकर ( Nana Patekar ) यांनी डॉ. प्रकाश बाबा आमटे आणि सोनाली कुलकर्णी ( Sonali kulkarni ) यांनी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे यांनी बाबा आमटेंची भूमिका साकारली आहे.
अश्या दुर्दम्य इच्छाशक्तीची कहानी डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पहा.
डॉ. प्रकाश बाबा आमटे यांचे प्रकाशवाटा हे पुस्तक सवलतीमध्ये विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.