Marathi Kavita – Mukhavate Tejache – मुखवटे तेजाचे
कवयित्री – अश्लेषा तोंदरे
लाख दिव्यांच्या राशी माझ्या
पुढ्यात आहेत अशा…
जणू नभीच्या तारका प्रकटल्या
उजाडण्या गर्द निशा…
मन मोहीले आकर्षिले पण
प्रेमात ना पडले तुझ्या…
तुझी काजव्यांची झळाळी
मनात ना भरली माझ्या…
तू दिवास्वप्न भासे दुरचे
शरदाच्या चांदण्यापरि…
गाठू कसा किनारा
तू ना ऐलतीरी ना पैलतीरी…
तुझी झगमग नुसती उथळ, पोकळ
तिस ना खोली असे त्या गर्त्याची…
तुझ्या हाकेत ना ती आर्तता
तिस झालर नुसती मोहाची…
बघता क्षणी विहंगम भासे
मनोहारी ते दृश्य तुझे…
पण क्षणात लयास जाती
तुझे सारे रंग फिकेच फिके…
तो एकच सूर्य पर्याप्त आहे
घालवण्या रूप कृत्रिम तुझे…
गळून पडतील अहंभाव सारे
तुझ्या तेजाचे ते मुखवटे…
- अश्लेषा
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-44/ […]