Marathi Kavita – जीवन

0
3723

 

Marathi Kavita – जीवन
Silhouette of hiking man in mountain
जीवन म्हणजे काय?
कधी आनंद देणारे
कधी दुख देणारे
कधी हवेसे वाटणारे
आणि कधी नकोसे वाटणारे
असेच असते ना जीवन ?
स्वतापेक्षा दुसर्याची चिंता करणारे
जीवालगाचे दुख कमी करून
आपल्या सुखात त्यांना वाटेकरू करणारे
असेच असते ना जीवन ?
गोर-गरीब, दुखी, कष्टी
लोकांच्या वेदना पाहून
गहिवरलेल्या मनाची साद ऐकून
त्यांना मदतीचा हात देणे
असेच असते ना जीवन ?
मरण हे सर्वांना येणार
माझा हि अंत आहे
पण, मरणा आधी मला माझा
समाज व कुंटुंबासाटीची कर्तव्य पार
पडण्याची धड-पड असणे
असेच असते ना जीवन ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here