Marathi Article Sparsh – स्पर्श
उतारे…. ज्याचा आशय हा एकच “स्पर्श “….
प्रस्तुतीच्या वेळी काही कारणास्त मुलीला जन्म देताच आईची प्राणज्योत मालवली.जन्म दिलेल्या मुलीची ही प्रकृती चिंताजनक होती म्हणून डॉक्टरांनी तिला दोन दिवस उपचारस एका बंद पेटीत ठेवले. तबयत स्थिरवल्यावर डॉक्टरांनी मुलीला पहिल्यांदाच तिच्या वडिलांच्या हातात आणून दिले. मऊ मऊ कापसावानी.तांबूस रंगाचा इवलूसे नाक. गोरे गोरे गाल.मीच मीच करत असलेले अर्धे उघडे डोळे आणि ओठा मधून गळणारी लाळ.तिला हातात घेताच कापसाच्या स्पर्शाने अंग शाहरून गेलं आणि बापाच्या डोळ्यात टचकन पाणी साचलं.स्पर्श होता तो वाळवंटा नंतर आलेल्या पावसाचा ..स्पर्श होता तो पितृत्वाचा ….
भटजी काकांनी वधू वरास हातावर हात धरण्याचे आग्रह केले. रुबाबदार हातावर नाजुक पाकळ्यांचा स्पर्श झाला आणि अंगात रोमांच शहारला. तिन्हे हळूच तिरप्या नजरेने नवर्या कडे पहिले आणि स्पर्शाची जाण नजरेने समझली. त्याने हळुवार धरलेले हात किंचित दाबले.स्पर्श होता तो उगवणार्या गोड नात्याचा.स्पर्श होता तो दोन शरीरांचा …..
पिकलेले केस होते दोघांचे.साधारण साठ सत्तर वय असेल त्यांचं.पिकलेल्या आंब्याच्या झाडा खाली एका बाकड्यावर दोघं बसून निखार्यावर चालून सोसलेल्या कणखर प्रवासाचा आढावा घेत होते.बरच काही भोगलं आयुष्यात बराच काही वेळा हसलो सुद्धा.वयस्कर काकांनी हळून आपल्या फाटक्या पिशवीतून
आबोलीचा गजरा काडला.लांब सोडलेल्या केश्वानमध्ये माळत असताना नकळत होणारा तो स्पर्श. प्रेमाचा… एकत्र जगलेल्या त्या क्षणाचा……..
आयुष्यात आपण बरच काही जगतो…पण जागता जागता स्पर्श अनुभवायचं राहून जातं.
I just love the way you define the meaning of ” SPARSH “.
Thank you so much Aakash