मेलं कमूनिकेशन : खूप लोक पै पै जोडून उद्योग चालू करतात. खूप चांगले ऑफिस उघडतात. पण एक मोठी चूक करतात. ती म्हणजे G-मेलं किवां Y-मेलं अशा फ्री वेब साईट वरून मेलं कमूनिकेशन करतात.
मी खूप लोकांना विचारले कि तुम्ही तुमचा कंपनीचा डोमेन का घेत नाही. तुम्ही फक्त तुमच्याच कंपनी डोमेन वरूनच मेलं कमूनिकेशन केले पाहिजे. एक वेळ तुमचे ऑफिस नसेल तर चालेल पण तुमचे मेलं कमूनिकेशन हे कंपनी डोमेन वरूनच झाले पाहिजे.
कंपनी डोमेन वरूनच मेलं कमूनिकेशनचे फायदे
- कंपनी सत्यता प्रमाणीकरण : कंपनी डोमेन वरूनच मेलं कमूनिकेशन केल्यामुळे हि कंपनी अस्तिवात आहे याची सत्यता प्रमाणीकरण होते. ग्राहक विश्वासाने वस्तू विकत घेतो. तसेच त्या वस्तूची आपल्या मित्र परिवारात जाहिरात करतो. हि जाहिरात खूपच प्रभावि असते. अशीच एखादी जाहिरात करण्या साठी बातमी पत्रात काही हजार रुपयांचा खर्च येतो. इथे आपण तेच खूप कमी किमतीत साध्य करतो.
- बाजार ब्रँड निर्मिती : कंपनी डोमेन वरूनच मेलं कमूनिकेशन केल्या मुळे बाजारात आपल्या कंपनीचा ब्रँड निर्मिती होतो. तसेच कंपनीच्या प्रवर्तकांना एक ओळख मिळते. जसे समझा श्री.तुषार यांनी नवीन कंपनी चालू केली श्रीटेक कमूनिकेशन. तर कंपनीचा डोमेन आहे श्रीटेककमूनिकेशन.कोम. तर श्री.तुषार यांचा मेलं असेल तुषार@श्रीटेककमूनिकेशन.कोम
आता यात दोन फायदे आहेत. एक तुषार कोण तर श्रीटेक कमूनिकेशन चा अशी ओळख निर्माण होईल. दुसरा श्रीटेक कमूनिकेशन कंपनी श्री.तुषार यांची. आपला मेंदू माहिती याच प्रकारे जमा करतो. आणि म्हणून आपण कंपनी डोमेन वरूनच मेलं कमूनिकेशन केले पाहिंजे.
या प्रकारे जर तुम्ही मेलं कमूनिकेशन केले तर तुम्हाला आज केलेल्या मेलं ची फळे पाच वर्षांनीही मिळत राहतील.
- माइक्रोसोफट ओउटलूक चा वापर करा : माइक्रोसोफट ओउटलूक हे मेलं कमूनिकेशन चे खूपच प्रभावि टूल आहे. याचा वापर करून मी आजही तुम्हाला मी १ जानेवारी २००८ मध्ये सकाळी दहा वाजता माझ्या ग्राहकाला केलेली मेलं बघू शकतो. याचा फायदा असा कि मला त्या दिवशी मी माझ्या ग्राहकाला काय किमत आणि त्याची अटी आणि नियम सांगितली होती त्याचा अभ्यास करू शकतो. त्यावर ग्राहका ची काय प्रतिक्रिया होती तेही बघू शकतो. तर तुमचे मेलं बोक्स एक मोलाची ग्राहक माहिती पुरवू शकतो.