Duniyadari : दुनियादारी

0
1551

कादंबरीवरून चित्रपट बनवण्याचे सूत्र आता मराठी चित्रपट निर्माते सुद्धा वापरायला लागले आहेत.

चेतन भगत यांच्या ‘5 Point Someone’ या कादंबरीवर आधारित ‘3 Idiots’ या चित्रपटाने तर अनेक उच्चांक गाठले…  नुकताच मराठी मध्ये आलेला. व. पु. काळे यांच्या पार्टनर या कादंबरीवर आधारित ‘श्री पार्टनर’ हा चित्रपट देखील यशस्वी झाला…

आता संजय जाधव .. सुहास शिरवळकर लिखित ‘दुनियादारी’ या कादंबरीवर आधारित … चित्रपट करत आहेत..

Duniyadari

दहा वर्षांपूर्वी दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी दिग्दर्शित केलेली दुनियादारी ही मालिका याच कादंबरीवर आधारित… या पूर्वी संजय जाधव दिग्दर्शित बेधुंद मनाची लहर ही मालिका सुद्धा

याच कादंबरीशी मिळती जुळती … कॉलेज तरुणाईवर आधारित या दोन्ही मालिका त्यावेळी सुपर हिट ठरलेल्या..

संजय जाधव या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.. तर चित्रपटची पटकथा आणि संवाद लेखन चिन्मय मांडलेकर करणार आहेत.

जितेंद्र जोशी या चित्रपटासाठी गाणी लिहिणार आहेत …

या तरुणाईवर आधारित चित्रपटासाठी कलाकार देखील तेवढेच महत्वाचे आहेत…

या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, उर्मिला कानीटकर, जितेंद्र जोशी, उदय सबनीस, वर्षा उसगावकर …. यांच्या प्रमुख भूमिका असतील ..

सुहास शिरवळकर यांची कादंबरी आजही सुपरहिट, त्यात सतीश राजवाडे यांची मालिकाही सुपरहिट …

चेकमेट, फक्त लढ म्हणा, रिंगा रिंगा असे उत्तम चित्रपट दिग्दर्शित करणारे संजय जाधव हे आपल्या कामात उत्तम आहेतच..

ही सुपरहिट कथा प्रेक्षकांना आकर्षित करेल का…हे लवकरच कळेल…

 

सुहास शिरवाळकर लिखित दुनियादारी ही कादंबरी १५% सावळातीत खरेदी करण्या साठि येथे क्लिक करा ..

सई चे काही खास फोटो पहाण्यासाठी येथे क्लिक करा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here