Domain Name and Hosting – डोमेन नाव व होस्टींग

0
1024
Domains
Domain Name and Hosting

संकेतस्थळाच्या म्हणजेच वेबसाइटच्या नावाला ‘ डोमेन नेम ‘ (DomainName)असे म्हणतात. तर वेबसाइटच्या जागेला ‘होस्टींग ‘(Hosting) असे म्हणतात.

‘ डोमेन नेम ‘(DomainName)आणि  ‘ होस्टींग (Hosting)’ सध्यातरी कुठेही मोफत मिळत नाही.

काही ठिकाणी ‘ डोमेन नेम ‘(Domain Name) मोफत दिलेले असते पण त्याची किंमत  ‘ होस्टींग ‘(Hosting) मध्ये आधीच जमा केलेली असते. जर आपण त्यांच्याकडे होस्टींग विकत घेतले तर आपल्याला ‘ डोमेन नेम ‘ (Domain Name)मोफत दिले जाते.

काही ठिकाणी ‘ होस्टींग ‘(Hosting) मोफत दिलेली असते परंतू तेथे ‘ डोमेन नेम ‘ त्यांच्याकडून विकत घेणे आवश्यक नसते. ‘ डोमेन नेम ‘ आपण इतर कोणत्याही कंपनीकडून विकत घेऊन होस्टींग या कंपनीकडून मोफत दिले जाते. यामागचा उद्देश फक्त इतकाच असतो तो म्हणजे त्यांच्या कंपनीची जाहिरात. इथे एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणेज जेथे मोफत काहीतरी मिळते याचा अर्थ त्यामध्ये नक्कीच काहीतरी कमतरता असते.

डोमेन नेम(Domain Name) आणि होस्टींग(Hosting) या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

वेबसाइटचे नाव म्हणजेच डोमेन नेम(Domain Name) हे जागतिक असते. ज्याप्रमाणे एखादा ई-मेल हा केवळ एखाद्याचाच असतो त्याच प्रकारे वेबसाइटचे डोमेन नेम हे देखिल एखाद्याने एकदा घेतले की जगातील दुसर्‍या कुणालाही ते मिळू शकत नाही.

काही वेळेस एखादे डोमेन नेम(Domain Name) नंतर मिळू शकणार नाही यासाठी फक्त डोमेन नेम विकत घेतले जाते. जर आपण वेबसाइट नंतर बनविणार असाल अथवा वेबसाइट बनविणार नसाल तर डोमेन नेम विकत घेताना होस्टींग विकत घेण्याची गरज नाही.

डोमेन नेम आणि होस्टींग(Hosting) या दोघांची किंमत निराळी असते. डोमेनची किंमत सर्वसाधारणपणे बर्‍याच ठिकाणी जवळपास सारखीच असते. तर होस्टींगमध्ये आपण किती जागा (MB अथवा GB मध्ये) विकत घेत आहात यावर ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here