Dhamal Vinodi Marathi Natak Gosht Tashi Gamtichi Review – गोष्ट तशी गमतीची

0
3975

Dhamal Vinodi Marathi Natak Gosht Tashi Gamtichi Review – गोष्ट तशी गमतीची

Marathi-natak-Gosht-Tashi-Gamtichi

नंदू कदम यांच्या सोनल प्रॉडक्शन आणि नाट्यसुमन यांची निर्मिती असलेले आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित मिहिर राजदा लिखित गोष्ट तशी गमतीची हे नाटक आजच प्रदर्शित झाले.

शशांक केतकर म्हणजेच “होणार सून मी या घरची” या मालिकेतून घराघरात पोचलेला आणि लोकप्रिय झालेला “श्रीरंग गोखले” म्हणजेच “श्री”  .. हा याच नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर प्रदर्पण करत आहे , पहिल्याच नाटकात शशांकने उत्तम अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत..

गोष्ट तशी गमतीची हे नाटक अद्वैत दादरकर यांच्याच “रिशता वही सोच नयी” या एकांकिकेवर आधारित आहे .

नाटक विनोदी असले तरी, कोठेही विनोद करण्यासाठी दिग्दर्शकांनी ओढून ताणून प्रयत्न केलेले नाहीत, सहज विंनोदातून एका विचार करायला लावणार्‍या प्रश्नावर दिग्दर्शकांनी भाष्य केले आहे.

गोष्ट तशी गमतीची नाटकात फक्त तीन कलाकार आहेत शशांक केतकर, मंगेश कदम आणि लिना भागवत, तरीही नाटक एक मिनिट देखील कंटाळवाणे ठरत नाही. मंगेश कदम आणि लिना भागवत या खर्‍याआयुष्यातील जोडीचे देखील हे पहिलेच एकत्र नाटक.

नाटकाचा विषय हा दोन पिढ्यामधील अंतर हा आहे, पण हाच विषय मांडताना दिग्दर्शकाने नव्या आणि जुन्या दोन्ही पिढ्यांचे मोनोगत उत्तम विनोदी स्वरुपात रसिकांसमोर सादर केले आहे.

दिक्षित कुटुंबामध्ये घडणार्‍या घटनांवर नाटक भाष्य करते, संजय दिक्षित आणि वासंती दिक्षित यांचा कुणाल दिक्षित हा एकुलता एक मुलगा, कुणालचा शेवटच्या वर्षाचा निकाल लागतो आणि नाटकाची सुरुवात होते, पुढे वडील आणि मुलामधील होणारे वाद म्हणजे रसिकांसाठी एक मनोरंजक जुगलबंदीच ..

हे वाद रोज ऐकून घेणारी आई लिना भागवत यांनी उत्तम साकारली आहे,

नाटकातील एक एक संवाद अप्रतिम आहेत, रोजच्या आयुष्यात घडणारे संवाद दिग्दर्शकाने उत्तम वापरले आहेत..

तुम्ही कसले स्मार्ट तुमचे तर फक्त मोबाइल स्मार्ट

 

विचार न करता अंताक्षरी खेळताना जुनीच गाणी का आठवतात

 

“तुझ्या त्या रॉबर्टनी तुला MMM प्रिन्सिपल नाही शिकवला?”

“म्हणजे?”

“मिडलक्लास मराठी माणूस”

असे अनेक संवाद सुरुवातीपासून शेवट पर्यन्त रसिकांचे मनोरंजन करता….

मग वडील आणि मुलाच्या जुगलबंदीत विजय कोणाचा होतो? कोण विजयी होते ? हे जाणून घेण्यासाठी पहा मराठी धमाल विनोदी पण विचार करायला लावणारे नाटक “गोष्ट तशी गमतीची“..

सोमवार ४ ऑगस्ट दु. ३:३० शिवाजी मंदिर

मंगळवार ५ ऑगस्ट दु. ४:३० प्र. ठाकरे, बोरीवली

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here