बदाम राणी गुलाम चोर(Badam Rani Gulam Chor)
निर्माता: शेखर कुलकर्णी, अजित भूरे
दिग्दर्शक: सतीश राजवाडे
कथा: डॉ. विवेक बेले
गीतकार: संदीप खरे
संगीत: डॉ. सलील कुलकर्णी
कलाकार: उपेन्द्र लिमये, आनंद इंगले, पुष्कर श्रोत्रि, मुक्ता बर्वे, डॉ. मोहन आगाशे, विनय आपटे, दीपक करंजिकर आणी सुधीर गाडगीळ.
बदाम राणी गुलाम चोर हा चित्रपट २००७ साली आलेल्या माकडाच्या” हाती शम्पैन” या डॉ. विवेक बेले यांच्या सुप्रसिध्द नाटकावर आधारित आहे.
सतीश राजवाडे यांचे उत्तम दिग्दर्शन व सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय..या मुळे चित्रपट अतिशय उत्तम बनला आहे
चित्रपट सुरुवातीपासूनच मनोरंजन करतो.
चित्रपटातील प्रेमाचा त्रिकोण आणि राजनीती यांच्यातील समानता..रंगात आणते..
चित्रपटाचा शेवट थोडा लवकर झाला असे वाटते…
तरी सुद्धा चित्रपट २ तास संपूर्ण पणे मनोरंजन करतो…
एकदातरी पाहण्या सारखा चित्रपट…जरूर पाहावा…