MarathiBoli Competition 2016 – वऱ्हाड
काळ्या मातीचे आहे ज्याला वरदान
संत्री आणि कापसाचे पीक होते छान
असा माझा माझा वऱ्हाड
आहे सोन्याची कुऱ्हाड
जीजाबाईचे जिथे सिंदखेडराजा माहेर
रुक्मिनिचेही इथे माहेर कौन्द्दन्यपुर
असा माझा वऱ्हाड
आहे सोन्याची कुऱ्हाड
ताडोबा हे एक अभयारण्य
वाघाचे जे निवासस्थान
असा माझा वऱ्हाड
आहे सोन्याची कुऱ्हाड
शिक्षण, स्वच्छतेची जनजागृती केली करून कीर्तन
अशा संतश्रेष्ठ गाड्गेबाबाचे हे जन्मस्थान
असा माझा वऱ्हाड
आहे सोन्याची कुऱ्हाड
शक्तीपीठ माहूर आहे जिथे
अंबादेवी निवास अमरावती इथे
असा माझा वऱ्हाड
आहे सोन्याची कुऱ्हाड
संत गजानन हे महान शेगावीचे
थोर महात्म्य या स्थळाचे
असा माझा माझा वऱ्हाड
आहे सोन्याची कुऱ्हाड
उल्कापातानी बनला आहे सरोवर
ते गाव असती लोणार
असा माझा माझा वऱ्हाड
आहे सोन्याची कुऱ्हाड
स्वाती वक्ते पुणे