Marathi Kavita – Apurnatva – अपूर्णत्व
कवयित्री – नुतन नागरगोजे
कधीतरी हराव ,
कधीतरी जिंकाव….
एका क्षणासाठी का होईना,
केंव्हातरी स्वतःसाठी जगाव …….
पूर्ण होण्यामागे ,
अपूर्णही असावं…..
स्वतःच्या व्याख्येमध्ये,
जगाच अपूर्णत्व भासावं ……
ठाम उभ राहून लढाव,
लढण्यामागे थोडसं हरणं असावं…..
भाळी सुखाची रेषा असावी,
कोणाच्या दुःखाने तिलाही कधी छेद पडावी….
रडता रडता हसाव,
हसता हसता जगावं …..
हसण्याच्या वाटेलाही,
कधीतरी कोणाच्या रडण्यानं वळण मिळाव…..
नुतन नागरगोजे……
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-68/ […]