क्लोन – Marathi Story

1
86
Marathi Story – Clone – क्लोन

Marathi Story – Clone – क्लोन

लेखिका – सिद्धी चव्हाण

(क्लोन ची संकल्पना सर्वज्ञात असली तरीही, २०५० हे वर्ष आणि नव्यानेच लागलेला शोध, मानवी क्लोन या अनुषंगाने रचलेली ही अंशतः विज्ञान कथा पुर्णपणे काल्पनिक आहे. यामधील कोणतेही ठिकाणी, व्यक्ती किंवा प्रसंग याचा वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. )

“श्री आवरलं का रे! तुझ्या ज्ञाती ला सरप्राइज गिफ्ट घेतल आहेस का काही? “

सूरुची आपला गाऊन नीटनेटका करत ओरडली.

“येस मम्मा! फस्ट टाईम त्यांच्याकडे जातोय आपण, ते ही कोणतीही पुर्वसुचना न देता, बट डोन्ट वरी, काही प्रॉब्लेम होणार नाही.”

श्री ही तयार होत जिन्याने खाली उतरला.

“ओह! माय हँडसम बॉय. लुकींग परफेक्ट. तिच्याशी काही बोलून झालं का रे? दोन महिन्यांनंतर भेटतो आहेस. बर्लिन वरुन आल्यानंतर पहिल्यांदाच आपण जातोय त्यांच्याकडे.”

” नो मम्मा, सरप्राइज आहे ना, मी अजीबात फोन वैगरे केला नाही. डायरेक्ट आमने-सामने… आय एम सो एक्साईटेड. मम्मा कार नको आज प्लिज… आधीच उशीर झाला आहे आणि ट्राफीक तर असणारच. सो हेलीकोप्टर ने जाऊ.” म्हणत दोघेही लिफ्ट च्या दिशेने चालू लागले.
श्री ने लिफ्ट बंद केली. आपल्या आलीशान बंगलोच्या अवाढव्य टेरेसवर नव्यानेच बनवून घेतलेल्या हेलीपॅड आणि त्यावर एक छोटस हेलिकॉप्टर सज्ज होत. क्षणाचाही विलंब न करता त्याने झेप घेतली आणि दोघे निघाले.

“श्री, तुझ्या लहानपणी आम्ही दोघे ही कारने प्रवास करायचो. नेहमीचा उशिरा आणि आदीची चिडचिड ठरलेली. आपली कंपनी तेव्हा एवढी मोठी नव्हती. जेमतेम नफा असायचा. पण बघ ना दिवस केवढे बदलले रे. या ३० वर्षांत चक्क आपल्या मालकीचे दोन हेलिकॉप्टर आले आणि प्रवास करणे अगदी सुसह्य झाले. तसही मंगळवारी सक्सेसफुल झाल्यामुळे खुप काही नवे शोध लागले आहेत…”

” हो ना मम्मा. अगं काल बेंगलोरमध्ये त्या उडत्या प्रयोगशाळेचा प्रयोग सक्सेसफुल केला. म्हणे ती प्रयोगशाळा चक्क उडू शकते. पाहिजे तिथे हलवता येऊ शकते. ते ही पाहिजे तेव्हा. आहे का नाही गंमत.”

” विधी चा नवरा काम करतो, तिथे पश्चिम समुद्रात तर समुद्रात आत काचेची घरं बांधली आहेत म्हणे.”

” हो ग मम्मा. जग खुप पुढे गेलं आहे. तू आता स्वयंपाकघरात जातेस का? नाही ना. आपली रोबोट डेली सगळं करते ना. घरची सगळी कामं करतेच, बाग बगीच्या पासुन ते लागणार्या प्रत्येक वस्तूंची खरेदी सुध्दा तिच करते. अंडर ग्राउंड ट्रेन, हँगिंग गार्डन, कृत्रिम ऑक्सिजन हे तर फार जुने झाले, आपण रोज चार डब्यांच उडत फ्लइट बघतो. कुत्रे मांजर असे प्राणी आता प्रयोगशाळेत सर्रास तयार होतात. चंद्रावर आपली पन्नास एक राहती घर आहेत. ग्रॅव्हिटीच्या एक पुढे पाऊल पुढे पोहोचलो आहे. आणि तू कुठल्या काळात आहेस मम्मा ? “

” खरं आहे. जग पुढे गेलं आहे आणि अजुन खुप पुढे जाणार!” सुरु स्वतः च्या विचारात गढून गेली. काही वर्षांपूर्वी, आज आणि अजुन काही वर्षांनी काय काय आणि कसे बदल घडत जातील याची बेरीज वजाबाकी करत बसली.


‘सूरुची आपल्या महागड्या डिजीटल पर्स बरोबर चाळा करत बसली होती. कधी ओठांवर नुसतेच दिखाऊ हसु… तर कधी त्या प्रशस्त होल मधुन बाहेर काचेतून दुरवर दिसणारी हिरवळ बघून तिला तिचाच कंटाळा आला. तिला फार अस्वस्थ ही वाटत होते. श्री आणि ज्ञातीच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. ते पाहून तर तिला कोण जाणे, काय नवल वाटले होते. तिच्या मनात विचारांचे काहूर माजले होते.

चहा-कोफी, नाष्टा वगैरे आवरलं होत. औपचारिक बोलनी देखील झाली. पण सुरुचे विशेष काही लक्ष लागत नव्हते, ती त्यात तितकासा इंटरेस्ट दाखवत ही नाही, ही बाब मिस्टर लेलेंच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कारण सुरूच्या या वागण्यामुळे मिसेस लेले ही अस्वस्थ झाल्या होत्या. शेवटी मुलीकडची बाजू होती.
” श्री तुमच्या आईंना काही शंका असेल तर विचारुन पहा. म्हणजे एकंदरीत त्यांच्या वागण्यावरून आम्हाला तसे जाणवले. “शेवटी मिस्टर लेलेंनी विषयाला हात घातला.

” ओहह्. आता तुम्ही विचारलं म्हणून सांगते. अशी मुलगी सुन म्हणुन घरी येणार तर आम्हाला थोडं अवघड वाटणार ना! हे सगळं जे तुम्ही आत्ता सांगितले ते माझ्यासाठी फारच नवीन आहे, बाकी काही नाही.” सुरूने एका दमात आपले मत मांडले.

“अशी म्हणजे? ती सुद्धा आमची मुलगी आहे. फक्त मी स्वतः तिला जन्म दिला नाही, तर ती तयार करुन घेतली आहे. मी तुमच्या भावना समजू शकते, पण यात वेगळं असं काही नाही.” मिसेस लेले नी आपली बाजू स्पष्ट केली होती.

” वावगं असं नाही? अहो ही कृत्रिम व्यक्ती आहे. आपल्या रक्ता-मासा पासून आपली मुलं तयार होतात, नाही तर सरोगसी पद्धतीने आपण पालक होऊ शकतो. ही तुम्ही दत्तक घेतलेली मुलगी असती तरीही ठिक होत. पण ही तर….

सूरुचीच बोलणं संपण्याच्या आत श्री ने तिला थांबवलं, कारण ती अजून पुढे काही बोलली असती तर नक्की गैरसमज वाढले असते. ” मम्मा, यातीचा जन्म व्हायच्या आधी केलेल्या सोनोग्राफी मध्ये असे दिसून आले की, तिला हार्टला होल आहे‌. आणि पुढे त्यामुळे तिच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. दुसरयाचे ह्दय रोपण करणेही फार जोखमीचे होते. तिला संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या क्लोन चा पर्याय सुचवला. तिच्या जन्माच्या आधीपासून प्रयोगशाळेमध्ये एक क्लोन तयार करून ठेवला गेला होता. याआधी आमचं या विषयावर बोलून झालं आहे. त्यांनी मला पुर्ण कल्पना दिली आहे. माझं चुकलं, हे मी तुला आधीच सांगायला पाहिजे होत.”

आपल्यामुळे इथे वेगळाच गैरसमज निर्माण झाला आहे, हे सुरुचीने ओळखलं होतं, आता पर्यंत आपण ज्या विषयावला धरुन गोल गोल फिरवत आहोत, त्याला आता डायरेक्ट हात घालण्याची गरज आहे, हे ओळखून तिने बोलायला सुरुवात केली.

“यातीला हदयाची गरज लागली नाही म्हणून ठीक आहे, पण जर तसे नसते झाले तर?”

” तर काय?” श्री ही आश्चर्यचकित झाला.

“तर ज्ञाती आज आपल्यात नसती.” सुरुची ने आत्ता पर्यंत रोखून ठेवलेले शब्द एका क्षणात उच्चारले.
“तुम्ही आपल्याच पेशींनी पण प्रयोगशाळेमध्ये तयार केलेला मानवी क्लोन आपल्या एका मुलीचे ह्दय वाचवण्यासाठी वापरणार, नंतर तो मृत क्लोन टाकून देणार? का त्याचा अजुन आपल्या कामासाठी काही वापर करणार ? आपण घरी एखादा पाळीव प्राणी आणला तरीही त्याच्या सोबत आपण असे वागत नाही. त्याला सुद्धा भावभावना आहेत, मुळात तो सुद्धा आपलाच जीव ना… असे कित्तेक आई वडील क्लोन तयार करून ठेवत असतील, आणि आपल्या जन्मदात्या मुलाला पाहिजे असणारा अवयव काढून तो क्लोन टाकून देत असतील. पुढारलेल्या तंत्रज्ञान आणि वैद्यकीय सेवा सुविधांचा वापर करून आपण काय करू लागलो आहे. यांचा आपण विचार केला पाहिजे. ज्या तंत्रज्ञानाची आपल्याला पूर्ण माहिती नाही, त्याचा वापर करणे कितपत योग्य आहे. “
सुरुचीला वेड्यात काढणारे डोळे पाणावले होते. मिस्टर आणि मिसेस लेले अवाक होऊन खाली बघू लागले. त्यांच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला.
” सॉरी “

मिस्टर लेले पुढे बोलू लागले.

“आम्ही याची कल्पनाही केली नव्हती आणि कधीच करु शकत नाही. भलेही यातीला वाचवण्यासाठी क्लोन म्हणून ज्ञातीचा जन्म झाला असेल, तरीही याती प्रमाणे शिक्षण वगैरे देऊन आम्ही तीच्यादेखील लग्नाचा विचार करत आहोत.”

“आणि विशेष म्हणजे या तंत्रज्ञानाची त्यावेळी आम्हाला विशेष कल्पना आली नाही. आपल्या पोटातील जीव वाचवण्यासाठी मी फार भावनीक झाले होते, त्यावेळी माझा आक्रोश बघून यांनी हे पाऊल उचलले. ज्ञातीचा क्लोन पुर्णत्वास येऊन डॉक्टरांनी तिला बालकरुपात जेव्हा माझ्या हातात आणून दिले तेव्हा आम्हाला याची कल्पना आली. एका जिवाची चालती-बोलती हुबेहूब प्रतिकृती म्हणजे मानवी क्लोन… आणि तो ही आपल्या प्रमाणेच जिवंत. ही कल्पनाच माझ्या विचारांच्या पलिकडे होती. मग मी यातीच्या आजारांवर वेगळी ट्रीटमेंट सुरू केली. ज्ञाती आमची मुलगी म्हणून वाढवली.” मिसेस लेलेनी आपले डोळे टिपत जमेल तसे स्पष्टीकरण दिले.

” सॉरी मम्मा, मी यांचा विचार ही करू शकत नाही.” श्रीही आपले डोळे पुसत म्हणाला.

“बरं मग लग्नाची तारीख काढायला सुरुवात करा.” म्हणत सुरुची उठली. आत्तापर्यंत आतमध्ये असलेली ज्ञाती बाहेर आली होती. तिला पाहताच सगळ्यांनी विषय बदलला. मिस्टर आणि मिसेस लेले ही उठून उभे राहिले. लग्नाची तयारी वगैरे याची बोलणी रंगात आली.

निघताना सुरुची ज्ञातीच्या केसांवरुन हात फिरवत म्हणाली. ” लागा तयारीला आता, आणि हा हनीमून डेस्टीनेशन प्लानिंग मी करणार! आत्ताच सांगते. रुसचा फ्लाईंग पॅलेस फिक्स… चालेल ना?” ‌

” माय ड्रीम डेस्टिनेशन”. श्रीची स्वारी खुश झाली.

ज्ञाती देखील गोड हसली.


रिमझिम पावसाळा सुरुवात झाली होती. वर आभाळाकडे बघत सुरुची म्हणाली.

“या वर्षी देखील कृत्रिम पाऊस…! पावसाने इकडे पाठ फिरवली जणू.”

ढगांचा मृदंग नाही.

विजेची टाळी नाही.

बेडकाचा आर्जव नाही.

ना खळाळते झरे.

दवांचे मोती नाहीत हल्ली

ओल्या पानांवर पहुडलेले.


……………………सिद्धी चव्हाण

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here