
Marathi Kavita -Anubhav – अनुभव
मिळाला अनुभवाचा पेहरावा
ते ज्ञान नाही मिळणार दुजा
अनुभवाविण खरा गुरू कोठे नाही मिळणार…!
ते अनुभवाचे ज्ञान बहुमोठे
नाही त्याच्यावर मात कोठे
अनुभवाचे बोली सदा सांगे खरे....!
जरी अनुभव असुनी
ती करती पुन्हा चुकी
तैसा मुर्ख मानव कोठे नाही……!
अनुभवाचे बोल सदा खरे बोले
ईथे नाही काही फसवे पणा
तूच खरा गुरु रे अनुभवा........!
- सचिन संजय चाळगोंड.
वय:-16
कुर्ली, पिन कोड-591241 ता. निपाणी. जिल्हा बेळगाव राज्य कर्नाटक.