किमया शब्दांची – Marathi Article – Kimaya Shabdanchi

2
1763
Marathi-Article-Kimaya-Shabdanchi

Marathi Article – Kimaya Shabdanchi – किमया शब्दांची

अस्त्रातील तेजस्वी अस्त्र ब्रम्हास्त्र या सारखी तीक्ष्ण धार असलेली शब्दधारा कधी कधी तर संपूर्ण मानवजातीच्या विनाशाला कारणीभूत ठरली आहे! हे तर आपण महाभारतातील दुर्योधणाच्या अविचारी बोलीतुन घेतलेल्या विध्वंसक युद्धाच्या निर्णयातुण पाहिले आहेच.

शब्दांच्याजाळ्यातून कितीतरी अपराध घडवून आणले आहेत, आजही अजमल कसाब सारखा ऐन तारुण्याणी बहारलेल्या पुष्पवेलीवर सत्कार्यांनी स्व क्षेत्रात यशाच्या पुष्पाचा सडा पडण्या ऐवजी कुठल्याही अनोळखी मतिभ्रष्ट बुध्दीशुन्या व्यक्तीच्या शब्दजालात गुरफटून मरणोत्तर जीवनाच्या धेय प्राप्तीच्या आशेने निरपराध निष्पाप बाल-वृध्द अशी कोणतीही मर्यादा नसलेल्या बेधुंद बेफाम गोळीबाराने रक्तरंजित मृतदेहाचा अगीणत सडाच पाडला. असे असुनही शब्दहे नवजात अर्भकाच्या हस्त स्पर्षासारखे कोमल, मधुमक्षिकेच्या पोळ्यातील मधाहुन मधुर, कठोर पाषाण ह्रदयी देहाला ही पाझर फोडणारे असे हे हळवे शब्द असतात याची प्रचेती युगंधर श्रीकृष्णाला पाहून होतेच की!

भावभावनांचे वक्तव्य करणारे रसाळ प्रेमाचे दोन शब्द संसारातील नवजीवनाला बहार आणणारे ठरतात. योगयोग्यांच्या साधुसंतांच्या प्रवचनातून कैक पिढ्यांच्यी जडण घडण झाली आहे. अहिंसेच्या तत्त्वावर लढणार्या रणसंग्रामातील प्रभावी शस्त्र म्हणजेच लेखणी! उन्मत्त माजलेल्या जीवाला चपराक मारण्यासाठी परखड निर्भीड वक्तव्य आणि लिखाण लेखकाच्या लेखणीने वेळोवळी केलेच आहे.

खरंच शब्दात विलक्षण शक्ती सामावलेली आहे हीच शक्ती अर्धमेल्या आत्म्याला हितोउपदेशाने तारु शकते आणि वेळ प्रसंगी जीवघेण्या बोलीने मारु शकते. सगळ्यांच्या आयुष्यात सुख दु:खांचे गोडकटू क्षणांची आवक जावक चालूच असते, त्यातही शब्दांचे गुणकारी मात्रा लागू पडते, दुःखात असताना आपल्या आदर्श व्यक्तिकडून ऐकलेले दोन शब्द जीवनात आशेचा नवीन किरण फुलवतात आणि सुखात असताना आप्तजनांणी केलेल्या खर्याखोट्या कौतुकाच्या ओव्या, गुणगाणांची स्तुती सुमने गायल्याणे अहंकाराच्या खोल गर्तेत घेऊन गेल्या शिवाय राहत नाही.

तमाशा मुळे कधी समाज बिघडला नाही आणि साधुसंतांच्या प्रवचनातून कधी सुधारला नाही. हे जरी खरे असले तरी शब्दांची जादू ही शब्दप्रयोग करणार्यावर आणि शब्दात असलेल्या तीव्र सौम्य धारेवर अवलंबून आहे, त्याचा प्रभाव कधी अंक्षकाळी, दिर्घकाळ तर कधी अखंड चालत आलेला आहे हेही सत्य नाकारता येत नाही.

समोरच्या व्यक्तीला आपण काही बोलण्या पुर्वी क्षणीक विचार जरुर करावा. समोरच्याला आपल्या मुळे कोणकोणत्या परिस्थतीला सामोरे जावे लागलेल व त्यामुळे त्यांच्या जीवनावर काही विपरीत परिणाम तर होणार नाही! ना याची खात्री करून घ्यावी नाही तर कधी काळी कळत नकळत केलेल्या एखाद्या गंमती मुळे समोरच्याला मानसिक वेदनाही देऊ शकतात अश्या प्रसंगांनमुळे आपले प्रिय आप्तजण दुरावले जाऊ शकतात त्याची मात्र आपण दक्षता घ्यायला हवी.

बोलून विचार करण्यापेक्षा विचार करुन बोललेल कधीही सोईस्करच, आयुष्य हे खुप सुंदर आहे. गुण्यागोविंदाने आनंदात हसतखेळत मर्यादेत राहून आयुष्याच्या सर्व सुख दुःखाचा अनुभव घ्या त्याच बरोबर शब्दांचे महत्व जाणून शब्दप्रयोग करा आणि जीवन उत्तोमत्तम बनवा.

शब्दनगरीच्या “तारु” आणि “मारु”  शकणार्या शब्दांवर ज्यानी स्वामित्व मिळवलं तोच खरा आजच्या युगातील “युगंधर”.

-© प्रशांत भोरे.

TAG: Marathi Lekh, Marathi Article, Marathi , MarathiBoli, Marathi Lekhak, Marathi Story, Marathi Kavita, Marathi Gani, Yugandhar, Marathi Vachak, Marathi Sahitya, Online marathi Sahitya sammelan, Marathibolachalval.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here