नमस्कार मित्रांनो,
मराठी ब्लॉगर्स बरोबर आज पासून मराठीबोली.इन वर उद्योजक हे एक नवीन सादर सुरू करत आहोत.
या सदरा मधून आपल्याला देश विदेशातील अनेक उद्योजकांची माहिती मराठी भाषेतून मिळेल.
आज आपण सुरू करत आहोत , कोणताही उद्योग सुरू करताना पळायच्या सोनेरी नियमापासून. हा नियम सर्वांनी पळायलाच हवा हा आग्रह नाही. पण पाळलात तर नुकसान नक्कीच नाही.
आज आपल्यापैकी अनेकांकडे उत्तोमोत्तम कल्पना सुचतात. पण या पैकी खूपच थोड्या कल्पनांचा उद्योगा पर्यन्त प्रवास होतो. आता ज्या कल्पना उद्योगा पर्यन्त पोहोचतात त्यापैकी ४० % उद्योग हे पाहिल्याच वर्षी बंद पडतात तर एकूण ९०% उद्योग हे तीन वर्षात बंद पडतात . हे फक्त मराठी भाषिकांसाठी नाही… सर्वच भाषेतील उद्योजकां विषयी आहे.
म्हणजेच १०० उद्योगां पैकी फक्त १० उद्योग ३ वर्षांनंतर सुरू राहतात..
मग हे १०० पैकी ९० उद्योग पहिल्या 3 वर्षातच बंद का होतात..
याचे महत्वाचे कारण आहे, चुकीचा खर्च
कोणताही उद्योग सुरू करताना सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे उद्योगासाठीच्या भांडवलाचा.
अनेक उद्योजक हे भांडवल जमा कराण्यासाठी खूप मेहनत घेतात पण खर्च करताना तेवढाच विचार नाही करत.
उद्योगाचा सोनेरी नियम – कमी खर्च जास्त नफा .
जेव्हा एखाद्या कल्पनेचा उद्योगा पर्यन्त प्रवास सुरू होतो, तेव्हा उद्योजक आपल्या कल्पनेला उद्योगा पर्यन्त पोहोचवण्यासाठी लागणार्या भांडवलाचे अनुमान काढतो. नफ्याची गणिते मांडतो आणि मग सुरू होतो गुंतवणूकदाराचा शोध.
गुंतवणूकदार उद्योजकाच्या BLUEPRINT मधील २ महत्वाचे मुद्दे पाहतो.
१. कल्पना मार्केट पर्यन्त पोहोचवण्याचा खर्च
२. लवकरात लवकर ग्राहक वाढवण्याचा खर्च
भांडवल मिळाल्यावर किती आणि कुठे खर्च करायचा हा महत्वाचा निर्णय उद्योजकाचा असतो.
१. उद्योगासाठी लागणारा मूलभूत खर्च.
या मध्ये यंत्र, उद्योगाची जागा आणि मनुष्यबळ
२. विपणन ( MARKETING )
आपले उत्पादन ग्राहकांपर्यन्त पोहचवण्यासाठी लागणारा खर्च हा खूप महत्वाचा असतो.. जाहिरातीवर किती खर्च करायचा याचा निर्णय उद्योजकाचा असतो, कारण विपणन प्रक्रियेवर संपूर्ण उद्योग अवलंबून असतो. कमी खर्चात आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी उद्योजकाने नवीन कल्पना वापराव्यात .
३. कार्यालयीन
कार्यालय किंवा कार्यालयीन सामुग्रीवर जाएसटी खर्च करणे टाळावे. अनेक उद्योजकांना सुरुवाती पासूनच आपले कार्यालय हे प्रशस्थ असावे असे वाटते पण सुरुवातीलाच मोठा खर्च करणे शक्यतो टाळावे.
४. अतिरिक्त
उद्योग सुरू करताना कायदेशीर कामासाठी लागणारा खर्च हा कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा.
उद्योगाचे यशस्वी होणे हे फक्त २ गोष्टींवर अवलंबून असते .
१. उत्पादन २. ग्राहक
कोणत्याही उद्योगाच्या सुरूवातीला खर्चाची मर्यादा असते आणि ती सर्व उद्योजकांना पळायचीच असते, त्यामुळे तुम्ही कोठे किती खर्च करता ते महत्वाचे ठरते. तुमचे उत्पादन चांगले असेल आणि ते ग्राहकांपर्यन्त पोहचत असेल तर, ग्राहकांना तुमचे कार्यालय कोठे आहे कसे आहे यात कोणताही रस नसतो..
आपले खर्च मर्यादित ठेवा आणि उत्पन्न वाढवा… हेच यशस्वी उद्योगाचे गणित असते.
जगातले जवळ जवळ ९० % यशश्वी उद्योग हे गारेज मध्ये किंवा छोट्या गोडाऊन मध्ये चालू झालेत.