Marathi Movie Jay Maharashtra Dhaba, Bhatinda : जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा

2
2473

Marathi Movie Jay Maharashtra Dhaba, Bhatinda : जय महाराष्ट्र ढाबा, बठिंडा

jay-maharashtra-dhaba-Bhatinda
अवधूत गुप्ते यांच्या जय महाराष्ट्र ढाबा, बटिंडा या नवीन मराठी चित्रपटाने मराठी रसिकांना सुखद धक्का दिला आहे.. मराठीत अभावानेच असणारी सस्पेन्स प्रेमकहाणी या चित्रपटातून रसिकांना अनुभवास मिळणार आहे.

जय महाराष्ट्र ढाबा, बटिंडा हा चित्रपट सुरूवातीस दिलवाले ची आठवण करून देतो…मात्र दिग्दर्शकांनी रसिकांना अशा समजुतीतून लवकरच दूर केले.

हि कहाणी आहे महाराष्ट्रातून पंजाब मधील बठींडा या गावात मराठी पदार्थांचा ढाबा चालवण्यास आलेल्या सयाजी निंबाळकर (अभिजित खांडकेकर) या मराठी तरुणाची व

Jay maharashtra dhaba bantinda

पंजाबी, मात्र मुंबईतील असल्याने मराठी चांगले बोलता येणाऱ्या जसविंदर कौर (प्रार्थना बेहेरे) यांची.

prarthana behere in jay maharashtra dhaba bhatinda

जसविंदर आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी बठींडामध्ये येते आणि ती सयाजीला दिसते त्याच क्षणी सयाजी जसविंदरच्या प्रेमात पडतो हळू हळू त्यांची प्रेम कहाणी फुलू लागते पण घरचे पाठींबा देतील का या एकाच जाणीवेने जसविंदर काळजीत असते अशातच दोघांचाही भूतकाळ समोर येतो तेव्हा …….

सयाजी पंजाबला येण्याचे खरे कारण जसविंदरला कळते तेव्हा ती त्याच्या अधिकच जवळ जाते. या दोघांचे प्रेम सफल होते का काही वेगळेच  घडते हे पाहण्यासाठी मात्र हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊनच बघावयास हवा.

हा चित्रपट सुरवातीला जरी ‘दिलवाले……’ची आठवण करून देणारा वाटत असला तरी दिग्दर्शकाने खुबीने प्रेक्षकाला यातून बाहेर काढले आहे व पूर्णपणे एका वेगळ्याच ट्रॅक वरून चकित करत शेवट केला आहे. याचे पूर्णपणे क्रेडिट दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांना जाते त्यांचे दुसरे क्रेडिट म्हणजे त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीला दिलेली एक छान फ्रेश पेअर अर्थात अभिजितला व प्रार्थनाला आपण मराठी मालीकांन मधून पहिले आहे पण दोघांचा पहिलाच चित्रपट असूनही दोघेहि सहजतेने वावरले आहेत विशेष कौतुक प्रार्थना बेहेरेचे करावयासच हवे , विक्रम गोखले, शुभांगी लाटकर, प्रियदर्शन जाधव यांच्या भूमिका नेटक्या झाल्या आहेत काही काही प्रसंगात प्रियदर्शनने मजा आणली आहे. राहुल जाधव यांचा कॅमेरा उत्तम , नीलेश मोहरीरने दिलेलं मस्त संगीत श्रवणीय खास करून अवखळसे……..

निर्माता – एकविरा प्रॉडक्शन्स , कथा – दिग्दर्शनः अवधूत गुप्ते
पटकथा, संवाद – अरविंद जगताप , संगीत – निलेश मोहरीर गीत – गुरु ठाकूर.

कलाकारः अभिजीत खांडकेकर, प्रार्थना बेहेरे, प्रियदर्शन जाधव, विक्रम गोखले, शुभांगी लाटकर, गणेश मयेकर, वरुण वीज, पुनीत इस्सार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here