72 Mail Ek Pravas Review – ७२ मैल एक प्रवास चित्रपट परीक्षण

0
1844

72 Mail Ek Pravas Review – ७२ मैल एक प्रवास चित्रपट परीक्षण

सध्या मराठी सिनेसृष्टीमद्धे चित्रपटांचे २ प्रकार मुख्यत्वे करून दिसतात, एक म्हणजे गाजलेल्या नाटकांवर आधारित चित्रपट किंवा गाजलेल्या कादंबरीवर आधारित चित्रपट.  मागील आठवड्यामधे प्रदर्शित झालेले टाइम प्लीज आणि श्रीमंत दामोदरपंत हे दोन्ही चित्रपट अनुक्रमे नवा गाडी नव राज्य तर श्रीमंत दामोदरपंत या नाटकांवर आधारित होते. तर सध्या तूफान गर्दीत सुरू असलेला दुनियादारी हा चित्रपट सुहास शिरवळकरांच्या दुनियादारी या कादंबरीवर आधारित आहे. हे तिन्ही चित्रपटांनी हाऊसफुल्ल चे फलक फडकावलेत.

यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन नुकताच राजीव पाटील दिग्दर्शित  ‘७२ मैल एक प्रवास’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपट अशोक व्हटकर यांच्या ७२ मैल या कादंबरीवर   आधारित आहे. अशोक व्हटकर यांच्या लहानपणीची ही एक हृदयद्रावक कथा आहे.

72 mail ek pravas marathi moview review

७२ मैल ही कथा आहे, अशोक(चिन्मय संत) ची, आई वडीलान मध्ये सतत होणारे मतभेद, रोजच्या भांडणाने कंटाळलेला अशोकचा मामा, आणि या सगळ्यांचा अशोक वर निघणार राग. अश्या प्रसंगातून कथेची सुरुवात होते. अशोकला बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवायचा निर्णय घेतला जातो आणि अशोकला सातार्‍याच्या च्या बोर्डिंगस्कूल मध्ये पाठवण्यात येते.

पण बोर्डिंगस्कूल मधील वातावरणात अशोक चे मन लागत नाही, आणि अशोक बोर्डिंगस्कूल मधून पळतो. आणि सुरू होतो सातारा ते कोल्हापूर हा ७२ मैलांचा पायी प्रवास. या प्रवासात अशोकला राधाक्का आपल्या चार मुलांच्या कुटुंबासोबत भेटते. त्यानंतर अशोक, राधाक्काच्या कुटुंबाचा एक हिस्सा बनतो. राधाक्काच्या अपार दुखी आयुश्याचा एक भाग बनून जातो . याच प्रवासात राधाक्काचे बाळ दीर्घ आजाराने मृत्यूमुखी पडते तर तरुण मुलगा सर्पदंशाने मरतो.

चित्रपट दुखी असला तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची ताकद चित्रपटात आहे, चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सरस आहे.  अमित राज यांनी उत्तम पार्श्वसंगीत दिले आहे. तर संजय जाधव यांनी सिनेम्याटोग्राफी केली आहे. राजीव पाटील यांचे दिग्दर्शन उत्तमच आहे.

स्मिता तांबे, चिन्मय संत, चिन्मय कांबळी, श्रावणी सोळसकर, इशा  माने या पाचही जणांचा उत्तम अभिनय. काही चुकले असेल तर ती म्हणजे चित्रपट प्रदर्शनाची वेळ. ९ ऑगस्ट ला शाहरुख खानचा चेन्नई एक्स्प्रेस हा चित्रपट प्रदर्शित झाला. ७२ मैल हा व्यावसायिक चित्रपट नसल्याने तो चेन्नई एक्सप्रेस समोर टिकणे जरा कठीणच. तरीही दुनियादारी, टाइम प्लीज, दामोदरपंत आणि आता ७२ मैल या सर्व चित्रपटांनि मराठी चित्रपटसृष्टीत एक नव चैत्तन्य नक्कीच आणले आहे.

[tube]DLKjvNARn-E[/tube]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here