MarathiBoli Competition – वारकरी
वारकरी विठ्ठलाच्या दारी
करतो हा वारी
चिंता सर्व विसरून घरी
असा हा वारकरी
आस त्याला एकच न्यारी
कधी दिसेल पंढरी
जिवा लागी ओढ सारी
असा हा वारकरी
जातीभेद विसरून सारी
करतो एकजुटीने वारी
विश्वची घर होती न्यारी
असा हा वारकरी
महाराष्ट्राचा लौकिक वाढवी वारी
कौतुक होती जगी भारी
विठोबाची भक्ती ही न्यारी
असा हा वारकरी
स्वाती वक्ते
पुणे