मी आणि साहित्यिक – Marathi Kavita

0
175
Marathi Kavita – Mi ani Sahityik

Marathi Kavita – Mi Ani Sahityik – मी आणि साहित्यिक

कवी : नवकवी ( आयुष बैले)

पू. ल.देशपांडेंच्या धरूनिया हाती,
चालत होतो तद्संगे मी… |
ऐकत होतो असा मी असा मी,
मनात होती ती फुलराणी …. |१

पाडगांवकर ही होते संगे,
धारानृत्यचे शिकवीत सत्र …|
क्षणांत दर्शविले त्यांनी.
आता उजाडेल ते सुख चित्र…|२

नारळीकर होते पाठीशी,
यक्षांची देणगी सांगत होते..|
त्यासंगे राहून माझेही,
आकाशाशी जडले नाते…|३

इंदिरा संत होत्या तद् वेळी,
सांगत मृगजळ,मेंदी,शेला..|
मज ही आवडे मामाचा वाडा,
आणि गवतफुला रे गवतफुला…|४

प्र. कें. च्या बोटाला धरुनी,
भरवित होतो कावळ्यांची शाळा..|
आठवतं होते मजला त्यांचे,
कऱ्हेचे पाणी ,काव्यांचा मळा…|५

कुसुमाग्रजांची ऐकून काव्ये,
लावला मराठी मातीचा टिळा..|
ललाट माझे उजळले तयाने,
जीवन लहरींचा फुलला मळा…|६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here