Marathiboli Competition 2016 – माझातली मी

0
1268

Marathiboli Competition 2016 – माझातली मी

marathi-kavita

मी…

मी एक मुलगी, मी मैत्रीण, मी एक प्रेयसी, मी पत्नी, मी आई आणि याच्याही पलीकडे मी एक “स्त्री ”

मी कोण आहे ?

मंद प्रकाशाच्या खोलीत, आरशात स्वतःच प्रतिबिंब पाहताना पडलेला हा प्रश्न.

पाहायला गेल तर खूपच सोपा प्रश्न पण उत्तर मात्र शब्दात न मांडता येणार ….

मी मुक्ता

आजही तो क्षण आठवला कि अंगावर काटा उभा राहतो, आणि स्वतःचीच घृणा वाटू लागते. माझ्याच घरात, माझ्याशी वाईट कृत्य करणारा तो पुरुष मी कसं काय त्याला बाबा म्हणू शकते ?

आजही आठवतंय आईला सर्व सांगितल्यावर तिने काहीच न बोलता, मला त्याच दीवशी मावशीकडे पाठवून दिलं कायमचं …. स्वतःपासून खूप खूप दूर

का बरं तिने असं केल असावं ?

तिने बाबांना याचा जाब विचारला का ?

का मिची कोणीच नाही ?

या सर्व प्रश्नांची उत्तरं आजही फक्त तिच्याच कडे आहेत .

मी एक Independent Educated Working Women आहे . श्रेयस माझा नवरा – well mannered educated  & most important  माझ्यावर खूप प्रेम करणारा.

पण तरीही मी त्याला व त्याचे ते घर सोडून , निघून आलेय माझ्या ऋता  ला घेउन. ऋता माझी पाच महिन्याची मुलगी.

कुठे कमी पडले मी त्याचा संसार सांभाळायला?

डब्या मध्ये कोणती भाजी बनवून द्यायची इथपासून स्वतःची इच्छा नसतानाहि नवऱ्याची sexual  need complete  करण्यापर्यंत मी कधिच कुठे कमी नाही पडले.

पण आज माझी काय चुकी झाली जर मी एका मुलीला जन्म दिला ?

ती तर आमच्या दोघानांचाच अंश आहे ना?

खरंच मी Independent  आहे ? मलाही आज आई इतकच एकट, असाह्य आणि लाचार झाल्यासारखं वाटतंय.

खरंच अशा किती स्त्रीया आहेत ज्या या समाजात स्वतःसाठी जगतात? का म्हणून सगळं मुकाटपणे सहन करायचं ? मी नाही म्हणत भांडा किंवा लढा पण जागा स्वतःसाठी जागा

आजच दिवस

(एका लहानश्या खोलीत एक आजी आपल्या नातीला अंगाई गाऊन झोपवतेय …)

“नीज गं माझी चिऊ राणी

नीज गं …

स्वतःसाठी जगायचं

जगाशी लढायचं

आभाळात उडायचं

बळ गं माझ्या पिल्लूत येऊ दे

नीज गं माझी चिऊ राणी

नीज गं … ”

आयुष्य आणि आईविषयी असलेल्या सर्व प्रश्नांवर रेघोट्या ओढून, माझ्या पंखात बळ एकवटून मी आज निघालेय उंच भरारी घेतलेय स्वतःसाठी, आईसाठी आणि ऋतासाठी .

एक स्त्री म्हणून एक पाऊल पुढं टाकलंय एक उज्वल भविष्य घडविण्यासाठी….

माझ्यातली “मी” शोधण्यासाठी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here