Marathi Movie Ajinkya Review : अजिंक्य
निर्मिती : संदीप आणि कोमल केवलणी आणि नीलेश नवलखा.
स्टुडिओ : एस के प्रॉडक्शन, नवलाखा आर्ट्स, मीडिया अँड एंटरटेंमेंट
दिग्दर्शक : तेजस देओसकर
कलाकार :संदीप कुलकर्णी, कादंबरी कदम, सारिका निलटकर, राजन भिसे, प्रवीण तारडे, विकास खुराना,दीप्ती पोतदार,सचिन देशपांडे,अभिजीत भोसले,राघवेंदरा तुपेकर,केतन पवार,अभिजीत जोशी,शासवत पाटील,सोजस थारकुडे,सिध्द्धेश,अक्षय, मानसी
लेखक : तेजस देओसकर
संगीत आणि पार्श्व संगीत : सुस्मित लिमये
गाणी : वैभव जोशी
It’s not always about winning!
खेळावर अनेक चित्रपट पूर्वी येऊन गेले…अगदी बॉलीवुड मध्ये सुद्धा क्रिकेट, हॉकी, फूटबॉल अश्या खेळांवर अनेक चित्रपट आले…
पण दिग्दर्शक तेजस देओसकर, यांचा पहिलाच मराठी चित्रपट अजिंक्य बास्केटबॉल या खेळावर आधारित आहे…
संदीप कुलकर्णी आणि कादंबरी कदम यांच्या प्रमुखा भूमिका असलेला अजिंक्य हा चित्रपट एका विवाहित बास्केटबॉल कोच ची कथा सांगतो.
कथा : – नेहमी अजिंक्य असलेला बास्केटबॉल कोच अनंत धर्माधिकारी बास्केटबॉल ची एक मॅच हरतो, आणि पत्नीला दिलेल्या वचना प्रमाणे बास्केटबॉल सोडून देतो… त्यासाठी तो बायको पासून आणि बास्केटबॉल पासून दूर जाण्यासाठी स्वताची औरंगाबादला ट्रान्सफर करून घेतो… पण अनंत त्याचे बास्केटबॉल प्रेम त्याला बास्केटबॉल पासून जास्त वेळ लांब नाही ठेऊ शकत…
औरंगाबादमध्ये बास्केटबॉल च्या ग्राउंडवर फूटबॉल खेळणार्या मुलांना अनंत बास्केटबॉल शिकवतो…
स्वतच्या अहंकारा पायी बायको पासून दूर आलेल्या अनंतला या मुलांना बास्केटबॉल शिकवताना …. अनेक गोष्टींची नव्याने ओळख होते… नात्यांचा अर्थ समजतो…