Marathi Kavita – Sutalelya Potavar – सुटलेल्या पोटावर
कवयित्री – सौ सविता खाडिलकर
सुटलेल्या पोटावर औषध काय,
सुटलेल्या पोटावर औषध काय,
मैदा आणि तुपाशिवाय पर्याय तरी काय?
माझा समोसा गं, माझी कचोरी गं,
वडापाव शिवाय आमचं भागतच नाय,
सुटलेल्या पोटावर औषध काय,
मैदा आणि तुपाशिवाय पर्याय तरी काय? || १||
दाबेलीची तर गंमतच लई न्यारी,
पावभाजी म्हणजे लई लई भारी,
लाडू, चकली, चिवडा आता बोर झाला हाय,
मैदा आणि तुपा शिवाय पर्याय तरी काय? ||२||
नुडल्स म्हणजे वाह ! वा ! मंचूरियन म्हणजे आहा !!
नुडल्स म्हणजे वाह ! वा ! मंचूरियन म्हणजे आहा !!
मोमोज ने तोंडाला पाणी सुटलं हाय,
मैदा आणि तुपाशिवाय पर्याय तरी काय? ||३||
केक म्हणजे यम्मी ,पेस्ट्रीज ने फुलते टम्मी,
केक म्हणजे यम्मी ,पेस्ट्रीज ने फुलते टम्मी,
पण जिभेचे चोचले आता पुरवायचे हाय,
मैदा आणि तुपाशिवाय पर्याय तरी काय? || ४||
सर्वांना आवडे बर्गर, अन पिझ्झा म्हणजे सुपर,
सर्वांना आवडे बर्गर, अन पिझ्झा म्हणजे सुपर,
सर्वच खाऊन आता तृप्त व्हायचे हाय,
मैदा आणि तुपाशिवाय पर्याय तरी काय? ||५||
किती व्यायाम करायचे, अन किती प्राणायाम करायचे,
किती व्यायाम करायचे, अन किती प्राणायाम करायचे,
वॉकिंग करून करून आता दुःखलेत पाय,
मैदा आणि तुपाशिवाय पर्याय तरी काय? || ६||
सुटलेल्या पोटावर औषध काय,
सुटलेल्या पोटावर औषध काय,
मैदा आणि तुपाशिवाय पर्याय तरी काय?
सौ सविता खाडिलकर, हैदराबाद.
(कवियत्री मराठी साहित्य परिषद, विश्व मराठी परिषद इ. कवी संमेलनांत पारितोषिक विजेती तसेच राज्यस्थरीय खेळात सुवर्ण आणि रजत पदक विजेती)