Marathi Kavita – पहिले पोहे
वय लग्नाचे उभे ठाकले
उपवधू मुलगा सर्वत्र कळविले
बंध मनाचे सुटू लागले
तिज शोधात सगळे गुंतले
फोटो पत्रिका सर्व पाहिले
मग पोह्यांचे निमित्त साधले
गोरे रूप गुणवंत देखणे
शिक्षण जॉब सर्व नेटके
हवेहवे ते सर्व मिळाले
हिच उद्याची सहचारिणी ती, स्वप्न रंगले
“रंगभरे बादल से, तेरे नैनो के काजल से… ” असे जाहले
होकाराचे कळविले
होकाराकडे कान लागले
[quote]१०० चा लिहिला, पैकीच्या पैकी मिळाले
तरीही, नापास शुन्य मिळाले
म्हणे, काळी शाई वापरल्याचे १०० कापले[/quote]
वर्णभेदाचे दु:ख जाणिले
लिंकन लढले गांधीही लढले
आपणही लढायला हवे
दुसऱ्या पोह्याचे वेध लागले….
Auto Amazon Links: No products found.









