डॉक्टर..असं कसं काय बोलतायं ??

0
124

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातलेला. पहिल्या लाटेच्या दणक्यातून उध्वस्त झालेला जुना रोजहाट जरासावरासावर करू लागतोयं तोवर नव्या जोमाने नव्या रूपाने कोरोना महाशय दाखल. एखादा खलनायक रूप पालटूननव्याने उभा ठाकावा असा काहीसा प्रकार.

       यंदा डॉक्टरसुद्धा जरा बिथरले आहेत. विषाणूचा नव्याने मारा फुफ्फुसांवर.  आत्ता आत्ताशी हे नवे वेगळे  प्रारूप डॉक्टरांच्या लक्षात येऊ लागलयं आणि सामान्य जनतामात्र “आम्हाला सगळं माहिती आहे. गेल्या वर्षी आम्ही बघितलयंसगळं.” या फुक्या आत्मविश्वासात बिनधास्तपणे वावरत आहे.जितके जमेल तितके समाजप्रबोधन आणि कोरोनाबाधितांना घरोघरी जाऊन तपासणी आणि औषधोपचारांचे माझे काम निमूटपणे चालू आहे.

          अशा सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांच्या छोट्या चौकोनी कुटुंबात कोरोनाचे आगमन झाले हळूवार आणि अलगदपावलांनी. घरातले चौघेही जणू तसे कामानिमित्त बाहेर पडणारे. वडील आणि आई दोघेही स्थायी नोकरी करणारे. मुलगीबँकेत लागलेली. मुलगा शेवटच्या वर्षाला. त्यामुळे ह्याच्यामुळे मला किंवा माझ्यामुळे ह्यांना अशा चर्चेची बातच नस्से. कुटुंबाला ओळखणाऱ्या कुणीतरी माझ्या नावाची शिफारस केली अन् मला रितसर फोन आला. मुलगी आणि वडीलदोघेजण बाधीत. आई आणि मुलगा दोघे काठावर.सुदैवाने बिल्डींगमध्येच एक रिकामा फ्लॅट आता त्यांचे नवीन घरझाला. भाऊ आणि आई शक्य तेवढी काळजी घेऊन त्यांचा बाकीचा प्रपंच खाणेपिणे सांभाळत होते. प्राथमिक तपासणीकरून औषधयोजना चालू झाली.

         दोनेक दिवसांत दोघांच्याही प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली पण आताशा आईसाहेबांना जरा अंगात कसकसजाणवू लागली. अंग मोडकळीस आलं.सध्या काय निदान एकचं कोव्हिड- १९. रक्ताच्या तपासण्या आणि छातीचा स्कॅनतातडीने करायला सांगितला.” डॉक्टर, तुम्ही आम्हांला दोघांनाही तपासण्या,स्कॅन नाही सांगितला. आईला का सांगताय ? काही जास्त आहे का ?” अशा प्रश्नांना उत्तर देणे खरंतर फार अवघड असतं. दोन कानांकडून स्टेथोमधून मेंदूकडे जाणाऱ्यासंवेदनांनी आम्हाला काय सांगितलयं याचा प्रत्यय त्या नातेवाईकांना कोणत्या शब्दांत द्यायचा असतो ते देवचं जाणे. असो.कालपरत्वे स्कॅन झाला. स्कोअर आला ४/२५(आता इथे स्कोअर वगैरे बाबत सुज्ञ वाचकांस सांगणे न लगे.

            रितसर औषधोपचार चालू झाले. एकमेव मुलगा ठणठणीत असल्याने तो लहान असला तरी त्याच्याशी बोलणे मीपसंत केले. का कुणास ठाऊक मला त्यांच्या आईचा तो अतिरिक्त हळवा आणि भित्रा स्वभाव आणि त्यांच्या सततच्याशंकाकुशंका यामुळे त्यांचा लुक आश्वासक वाटेना. गरज लागल्यास आपल्याला बेडही उपलब्ध करावा लागेल असंबोललो. ” अहो डॉक्टर…. असं कसं कायं बोलतायं ? मागच्या वर्षी तुम्ही त्या अमुकतमुक कुटुंबाला सहज वाचवलतं. त्यात तर ती ७४ वर्षाची मधुमेही आज्जी आणि आता तुम्ही मम्मीबद्दल असलं सागतायं होय. अहो स्कोअर ४ आहे फक्त” मी फक्त मान डोलावली आणि बाहेर पडलो. काही संभावना अव्यक्त ठेवणे गरजेचे असते. 

        दुसऱ्या दिवशी दोनवेळा अनाहूतपणे मीच त्यांना फोन लावला.कदाचित माझी बेचैनी मला स्वस्थ बसून देतनव्हती.”कालपासून बराच फरक आहे.दोन दिवस झोप लागली नव्हती मला पण काल रात्री शांत झोप मिळाली.” असाचकाहीसा प्रतिसाद मला अपेक्षित होता. प्रत्यक्ष तपासणीनंतर मात्र मी फारसा खुश नव्हतो.तिसरा दिवससुद्धा यथातथाचगेला. वाफारा,गरम पाण्याच्या गुळण्या,दीर्घ श्वासाचे व्यायाम या सगळ्यांचा परिपाक असावा पण आईंची तब्येत फारआश्वासक वाटत नव्हती. तोपर्यंत घरातल्या तरूण मुलाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आलेला. त्याचा अतिरिक्त ताण मातेच्यादेहबोलीतून स्पष्ट जाणवत होता.

          सकाळी न राहवून मीच फोन केला. “डॉक्टर, आज जरा अंगदुखी वाढलीयं आणि खोकल्याची उबळ येतीयं राहूनराहून”आवाज पार खोल गेलेला. मी लागोलाग मुलाशी बोललो. “त्यांचा परत सीटी स्कॅन करायचा आहे आत्ता लगेच” तोसुद्धा जरा बावचळला. थोडा सावरला.”डॉक्टर,मम्मीला घेऊन लगेच जातो” जवळच्या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये तोपर्यंतलांबलचक रांग लागलेली. माझा जीव इकडे टांगणीला लागलेला आणि त्याचासुद्धा. तासाभरांत दोनतीन वेळा फोनाफोनीकरूनसुद्धा नंबर लागेना…   त्याला म्हणालो “लगेच इकडे ये. स्कॅन होणे गरजेचे आहे.” आता तोसुद्धा बऱ्यापैकी गंभीर. पंधरामिनिटांत हॉस्पीटलच्या डायग्नोस्टिक विभागांत. त्यावेळी जवळपास पंधराएक तासांच्या फरकाने त्याच्या मातोश्रींना बघतहोतो.श्वासाचा वेग जवळपास ३०-३२. शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण जेमतेम ९०%.”काही नाही हो डॉक्टर.काल रात्रीझोप झाली नाही. सकाळी ही पळापळ.जरा दमछाक झालीयं. बाकी काही नाही” भारतीय नारी तुला सादर प्रणाम…..

         सीटी स्कॅनच्या मॉनिटरवर त्यांच्या फुफ्फुसांचे जे काही चित्रण पाहिले आणि बुडाखालची खुर्ची सरकली. पायाखालची जमीन हादरली आणि डोक्यांत घण आदळू लागले. दोन्ही फुफ्फुसांमध्ये पांढुरक्या सावल्यांचे जाळे…. दोनतीन वेळा मोजमाप केले तरी स्कोअर पंधराच्या खाली येईनाच.. त्यांना बाहेर घेऊन स्थिरस्थावर करेपर्यंत सविस्तरगुणपत्रक मिळाले. गुणांक १८/२५. गेल्या स्कॅनपासून केवळ ८० तासांच्या आत नवीन रिपोर्ट… बाहेर जाऊन कायसांगणार….औषधोपचार चालू असताना एवढ्या परिसीमेची दुरावस्था…. डॉक्टरांची ही अगतिगकता कळणेदुरापास्त….म्हणतात ना जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे….

 तातडीने दाखल करणे गरजेचे…त्यावेळी बेडची उपलब्धता अशक्यप्राय..त्याहूनही रेमडेसिव्हिर नामी संजीवनीबुटीची मारामार… बाहेर आलो. त्यांच्या चिरंजिवाला सगळी कल्पना दिली. प्रसंगाचे गांभीर्य समजावून सांगितले. “डॉक्टर,तुम्ही असताना हे झालचं कसं? तिला काही पूर्वीचा आजार नाही. मला काही माहिती नाही. माझी मम्मी व्यवस्थित झाली पाहिजे. मला बाकी काही सांगू नका. काय ते तुमचं तुम्ही बघा. असं काय बोलतायं डॉक्टर?”  अश्रूंनी बांधसोडलेला.त्याचे वैफल्य वेगळ्या स्तरावर. त्याला पुढे समजावणे अशक्यप्राय. इतक्यात त्याच्या मामाचा फोन आला. त्याने इकडेतिकडे थोडा राजकीय संबंध लावून एक बेड उपलब्ध केला पण तोपर्यंत त्याला रिपोर्ट माहिती नव्हते. स्कोअर १८/२५ म्हटल्यावर तिथल्या डॉक्टरांनी नकारघंटा वाजवली. “आता काय करायचे ते तुम्हीच करा डॉक्टर. मी पोहोचतोयं अर्ध्यातासांत.”

  मी पण बऱ्यापैकी हताश. समोर गर्द अंधार आणि प्रकाशाचा एक किरणसुद्धा दिसेना.. डॉ.साठे सरांना फोनलावला.”सरजी एक बॅड केस आहे पण घ्यायला लागतीयं. १८/२५.नो को मॉरबिडीटीज्.” “सरजी बेड नाही हो. एकडिस्चार्ज आहे पण नॉन ओटू बेड. दुसरी उद्या आहे. तिला ट्रायल द्यायची आहे. अजून.त्यांनी आत्ताच कॉन्सर्ट्रेटर आणलायं”  मला अख्खी प्रकाश शलाका दिसू लागली. मातोश्रीबाईंच्या सुदैवाची गाठोडी भरभक्कम होती कदाचित…उद्या डिस्चार्जहोणाऱ्या पेशंटला ओटू कॉन्सर्ट्रेटरवर आणि आज डिस्चार्जवालीला खुर्चीवर बसवून आईसाहेबांना बेड मिळाला..

           तोपर्यंत माझ्या आणि चिरंजीवांच्या सुदैवाने मामांचे आगमन झाले. त्यांनी त्यांच्या थोरल्या बंधूना फोन लावूनदिला.दोन्ही मामा समाजकारणाशी थोडे निगडीत असल्यामुळे परिस्थितीशी बरेचसे अवगत होते. “डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी जे करतायं त्याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे.  तुमच्या सगळ्या प्रयत्नांना आमची संपूर्ण साथ आहे. आम्हीकाय करायचे ते आम्हांला सांगा. परिणामांची आम्हांला कल्पना आहे त्याचा विचार तूर्तास नको.” एका डॅाक्टरला ह्यापाठबळाच्या शब्दांचा काय दिलासा मिळतो याची जाण होण्यासाठी डॅाक्टराचा जन्म घ्यावा….

  पुढचे तीनेक दिवस मला ना झोप लागली ना त्या कुटुंबीयांना.. आता बराचसा संवाद दोन्ही मामांबरोबरच होतहोता.प्रकृतीचे गांभीर्य आणि दर दिवशी एकमेकांना दिलासा असे जवळपास तीनेक दिवस गेले. प्रत्येकवेळी आईसाहेबांनाभेटायचो तेव्हा उधारउसनवारे त्यांना धीर द्यायचो आणि स्वत:लाही. सरकारी नियमानुसार दुसऱ्या दिवशी सुदैवानेरेमडेसिव्हीर उपलब्ध झाले होते आणि चौथ्या दिवशी काकूंमध्ये लक्षणीय सुधारणा दिसू लागली. ”आज खरचं बरंवाटतयं डॅाक्टर. खोकला अगदी कमी आलायं. परमेश्वर कृपेने एकदाही ढास लागली नाही सकाळपासून.”  मी सुद्धा देवादिकांचे मनोमन आभार मानले.

  त्यानंतर परमेश्वराने डॅा. संजय साठेंच्या परिश्रमाला साथ दिली बहुदा आणि काकूंच्या कुटुंबियांच्या हाकेला ओ दिलीअसावी.आठव्या दिवशी काकू वॅार्डामधून एक फेरी मारून आल्या.अजूनही ॲाक्सिजनची पातळी खालावत होती पणकिमान हालचाल चालू झाली.दहाव्या दिवशी कॅान्सर्ट्रेटरवर शरीरातली ॲाक्सिजन पातळी स्थिरावली आणि “सवयभान”च्या मशीनसंगे काकू घरी स्थिरावल्या.

       ४-५ दिवसांनी मामांनी आग्रहाने घरी बोलावले. काकूंच्या तब्येतीत लक्षणीय बदल जाणवला. आपल्या घराचाओलावाचं वेगळा. ॲडमिशनच्या दिवशी कातावलेला मुलगा,दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मला थोडेसे परावलीचे शब्दवापरणारी मुलगी, सर्वतोपरी माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या शब्दाला आणि कार्याला मान देणारे दोन्ही मामा, ज्यांच्यामुळे या कुटुंबाला माझी शिफारस झाली ते मित्रवर्य…. आता सगळे सुखावले होते. 

            आज भरलेल्या रकमेच्या पावत्यांवर माझ्या सह्या नेण्यासाठी तो आयसीयुमध्ये आला होता.तसा थोडा शांतचहोता.मी काही कामात मग्न होतो म्हणून काऊंटरवर निमूटपणे उभा होता.मागे एका पोस्ट कोव्हिड लंग फायब्रोसीसच्यारुग्णेबरोबर तिच्या नातेवाईकांचा संवाद चालू होता. तिचे नातेवाईक तिचे मनोबल वाढवण्याचे अतोनात प्रयत्न करताहेत. माझे काम संपले.नेमाने मी त्याच्या आईच्या सगळ्या बिलांवर ॲटेस्टेड सह्या केल्या.

            त्याच्या डोळ्यांत पुन्हा अश्रू……थांबेतनाचं.. “डॉक्टर,रिअली सॉरी.त्यावेळी आम्ही असं रिॲक्ट व्हायला नकोहोतं. आज या नातेवाईकांचे बोल ऐकले आणि मम्मीची आठवण झाली.तुम्ही वेळीचं लक्ष दिलं नसतं तरं कदाचित मम्मीअशी असती.. एकदा तुमच्या पाया पडायचे आहे प्लीज…”  तो त्यादिवशीसुद्धा ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता आणिआजसुद्धा….

      साधारणतः महिन्याभराच्या अंतःकालात दैत्यापासून ते देवत्वापर्यंतचा हा प्रवास माझ्यासारख्या अतिसामान्यमाणसाला झेपायला फार अवघड होता.

         ना त्वहम् कामये राज्यं

             न स्वर्गं नापुनर्भवम्….

         कामये दुःखतप्तानाम्

             प्राणीनाम् आर्तिनाशनम् ॥

                   डॉ. उदयराज उर्मिला उत्तमराव फडतरे

                                 ०१/०७/२०२१

                              नॅशनल डॅाक्टर्स डे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here