Touring Talkies Marathi Movie Review – टुरिंग टॉकीज परीक्षण

0
1438

Touring Talkies Marathi Movie Review – टुरिंग टॉकीज परीक्षण

touring talkies

भारतीय चित्रपट सृष्टीला १०० वर्षे पूर्ण होत असतानाच टुरिंग टॉकीज हा मराठी सिनेमा प्रदर्शित झाला. टुरिंग टॉकीज म्हणजे फिरता तंबूतला सिनेमा, जो गावो गावातील जत्रांमधे दाखवला जायचा.. अर्थात अजून देखील काही गावांमध्ये जत्रांच्यावेळी टुरिंग टॉकीज मध्ये सिनेमा दाखवला जातो. पण त्याचे प्रमाण मात्र खूप कमी झाले आहे.

जत्रेत सिनेमा दाखवण्यास खूप पूर्वी पासूनच सुरुवात झाली ती फिरत्या सिनेमाच्या माध्यमातून, मोठ्या तंबूचा हा एक सिनेमाहॉल,  जत्रा म्हणजे गावाकडचा मॉल असेही आपण बोलू शकतो, मॉल प्रमाणेच इथे सुद्धा एका वेळेला ३ किंवा कधी त्यापेक्षा ही अधिक चित्रपट रसिकांसाठी उपलब्ध असायचे.

तर या व्यवसायावर आधारित हा टुरिंग टॉकीज चित्रपट.

गजेंद्र अहिरे दिग्दर्शित टुरिंग टॉकीज,  या चित्रपटातील हीरो आहे चांदी (तृप्ति भोईर), गावाकडील जत्रांमधे तंबूत सिनेमा दाखवण्याचा व्यवसाय करणारी चांदी, पण तिचा बाप बेवडा आणि जुगारी, जुगाराच्या एका डावात तो आपला संपूर्ण तंबू हरतो.

चांदीला हा तंबू परत मिळवायचा आहे, याच वेळी चांदीच्या तंबूत चालणारा चित्रपट चांदी कडून जातो, आणि चांदीकडे तंबूत दाखवण्यास एकही चित्रपट उरत नाही. अश्याच वेळी चांदीला भेटतो एक आर्ट फिल्म डायरेक्टर(सुबोध भावे) याचा सिनेमा हा फिल्म फेस्टिवल गाजवत असतो, चांदी हा सिनेमा घेते. पण चित्रपटाचे नाव शाई होते शुभ्र हे बदलून गेला हात चोळीत असे ठेवते.

दुसर्‍या बाजूने बघितले तर एक प्रश्न पडतो, की गावातील तंबूंमधे हा आर्ट सिनेमा एवढा कसं चालतो, पण चित्रपटाच्या कथानकामुळे हा प्रश्न डोक्यात येत नाही.

[tube]l-XDi9uMSX8[/tube]

इलीयाराजा यांचे उत्तम संगीत चित्रपटाला रंगत देते, चित्रपटामध्ये इलीयाराजा यांनी इंग्लिश पार्श्व संगीत वापरले आहे, संगीत सुंदर आणि श्रवणीय आहे, पण इथे एखादे सुंदर मराठी गाणे नक्कीच वापरता आले असते.

चित्रपटाचे उत्तम कथानक, गजेंद्र अहिरेंचे दिग्दर्शन, अमोल गोळे यांची सिंनेमाटोग्राफी, या मुळे चित्रपट अधिकच पेक्षणीय बनतो. तृप्ति भोईर यांनी रंगवलेली चांदी तर उत्कृष्टच, चांदीचा मर्दानी राबडीपणा तृप्ति भोईर यांनी मस्तच रंगवला आहे.

सुबोध भावे यांनी रंगवलेली आर्ट फिल्म डायरेक्टर ची भूमिका पण मस्तच, तर किशोर कदम यांनी या तंबूतील अनौन्सर ची साकारलेली भूमिका तर मस्तच.  नेहा पेंडसे यांनी केलेली पाहुणी भूमिका पण चांगली.

एकुणच चित्रपट हा सुंदर आणि प्रेक्षणीय, चित्रपट टुरिंग टॉकीज विषयी असला तरी गजेंद्र अहिरे यांनी या व्यवसायाच्या खोलात जाणे टाळले आहे, चित्रपट डॉक्युमेंट्री नसून एक संपूर्ण व्यावसायिक चित्रपट आहे.

टुरिंग टॉकीज च्या हरवत चाललेल्या दुंनियेचा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here