स्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे

0
1746

स्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे

मुंबई म्हणजे मायानगरी… मुंबई म्हणजे स्वप्ननगरी… मुंबई म्हणजे आशेची नगरी… मुंबई विषयीची ही ख्याती गेल्या अनेक वर्षांपासून सर्वमान्य आहे. सर्वसामान्य कष्टकरी माणसासाठी जिथे हाताला काम आणि घामाला दाम अशी ख्याती असलेलं शहर म्हणजे मुंबई. मुंबई हे बहुरंगी कॉस्मॉपॉलिटियन शहर असले तरी मराठी माणसाचा ठसा येथील प्रत्येक गोष्टीवर दिसून येतो. महाराष्ट्राबाहेरुन परप्रांतीयाचे येणारे लांेढे, उदयोगधंदयात त्यांचे वाढणारे वर्चस्व असे जरी असले तरी, मराठी माणसाच्या अस्तित्वाची नाळ मुंबईच्या अस्तित्वापासून कोणी वेगळी करु शकत नाही. छत्रपती शिवरायांनी प्राणपणाने मिळविलेल्या या स्वराज्याचे शिलेदार, आजचे मराठी तरुण विविध क्षेत्रांत आपल्या कर्तुत्वाची पताका रोवीत आहेत, याच धतीर्वर राम पाठारे या तडफदार तरुणांचा रोमांचित करणारा प्रवास स्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे चित्रपटात राम पाठारे या तडफदार तरुणाच्या संघर्षाची कथा मांडण्यात आली आहे. चाळीतल्या मध्यमवगीर्य जीवनात राम उदयोगधंदयाची मोठी स्वप्न बघतो आणि ती प्रत्यक्षात उतरवितो. गरीबीतूून वर आलेल्या रामचे चाळीतल्याशी सलोख्याचे, जिव्हाळयाचे संबंध आहेत. त्यांच्यासाठी तो एक संघटना उभी करतो. पण त्यांचे हे यश काही समाजकंटकांना खटकते. ते राम विरुध्द कट कारस्थाने रचू लागतात.’  मराठी माणूस ना कधी अपयशी होता आणि ना आहे.. मराठी माणसाकडे बघण्याचा हा दृष्टीकोन बदलण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या निमित्ताने करण्यात येतोय. मराठी माणसाची यशोगाथा मांडणारा स्वराज्य…मराठी पाऊल पडते पुढे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here