Sandook Marathi Movie – संदूक मराठी चित्रपट

0
4815

अतुल काळे दिग्दर्शित आणि विश्वजित गायकवाड आणि मंदार केणी यांच्या ORANGEN Entertainment Produced संदूक हा चित्रपट ५ जून पासून रसिकांच्या भेटीस येत आहे.

संदूक हा ऐतिहासिक विनोदी चित्रपट आहे, चित्रपटाचा कालखंड १९४० च्या दरम्यान आहे, संदूक हे दिग्दर्शक अतुल काळे यांचे १२ वर्षांपासूनचे स्वप्न होते, जे विश्वजित गायकवाड आणि मंदार केणी यांच्या सहकार्याने ५ जूनला रसिकांच्या भेटीस येत आहे.

१६७४ पासून शौर्‍याची परंपरा असलेल्या अष्टपुत्रे घराण्यातील वामन अष्टपुत्रे यांची १९४० मधील ही ऐतिहासिक विनोदी कथा.

संदूक विषयी बोलताना दिग्दर्शक अतुल काळे सांगतात “संदूक हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे, १२ वर्षांपासून पाहत असलेले स्वप्न. संदूक चितपटात असलेले  VFX Effects आणि चित्रपटाचा ऐतिहासिक विनोदीपणा या मुळे चित्रपट बनवणे सोपे नव्हते.”

३ दशकांपेक्षाही अधिक काळ चित्रपटसृष्टीत काम केल्यावर सुमित राघवन यांचा हा मुख्य कलाकार म्हणून पहिलाच मराठी चित्रपट, या विषयी सुमित राघवन बोलतात “अतुल हा माझा बालमित्र, आणि त्याच्या स्वप्नाचा भाग होणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, संदूक ची निवड मी माझ्या पहिल्या चित्रपटासाठी केली याचा मला आनंद आहे. दरम्यानच्या काळात चित्रपटांच्या अनेक संधी आल्या पण मला संदूक सारखे काहीतरी वेगळे करायचे होते.”

चित्रपटात सुमित राघवन यांच्या सह प्रमुख अभिनेत्री म्हणून भार्गवी चिरमुले आहेत, चित्रपटात अरुण नलावडे, शरद पोंक्षे , आनंद इंगळे , राहुल मेहंदळे असे दिग्गज कलाकार आहेत.

संदूक चित्रपटच्या यूट्यूब वरील ट्रेलर ला जवळ पास १लाख views मिळाले आहेत.

संदूक चित्रपटाचे ट्रेलर मराठीबोली च्या वाचकांसाठी.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here