Proposal Marathi Natak : प्रपोजल मराठी नाटक

0
3985

Proposal Marathi Natak : प्रपोजल मराठी नाटक

मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगवेगळे प्रयोग होत असतात…

मराठीबोली वरील लेख ईमेल द्वारे मिळवण्यासाठी ईमेल आयडी द्या.

असाच एक वेगळा प्रयोग सादर करीत आहे नवीन मराठी नाटक “प्रपोजल”.

Proposal marathi natak

खरेतर या नाटकाच्या बोल्ड जाहिरातींनी आधीच नाटकाचा बोल्डपणा रसिकांसमोर आणला…

सर्वसामान्य नाटकांमध्ये २-४ वेगवेगळे सीन असतात, एखादा हॉल मधला, एखादा बेडरूममधला ..पण प्रपोजल ह नाटक वेगळे आहे… कारण हे नाटक रसिकांसमोर सादर होते ते एका लोकल ट्रेन मधून..

नाटकाच्या दिग्दर्शकांनी(राजन ताम्हाणे) लोकल ट्रेनचा एक डबा रसिकांसमोर सादर केला आहे..

या नाटकाचे नेपथ्य खूपच महत्वाचे कारण …चालणारी लोकल ट्रेन रंगभूमीवर सादर करणे खरच खूप कठीण आव्हान होते…

पण ते अगदी उत्कृष्टपणे साकारले गेले आहे….

लोकल ट्रेनच्या दुसर्‍या बाजूंनी मागे जाणारे वेगवेगळ्या स्टेशन्सचे फलक .. ट्रेन ला जीवंत करणायस मदत करतात..

Proposal Marathi Natak

हा लोकल ट्रेनचा प्रवास आहे तो ठाणे ते कर्जत चा… तो ही शेवटच्या लोकल ट्रेन मधील..

Proposal Marathi Natak

ही गोष्ट आहे दोन तरुणांची… त्यातील एक आहे निवृत्ती पवार(डॉ. अमोल कोल्हे)…एक सरळ साधा मराठी माणूस…आणि दुसरी आहे एक कॉल गर्ल(अदिति सारंगधर)…

दोघांनीही या नाटकात उत्कृष्ट भूमिका केली आहे…अदिति सारंगधरनि रंगवलेली कॉल गर्ल उत्तमच…

हे दोघे भेटतात शेवटच्या ट्रेन मध्ये… आणि सुरू होते एक कहाणी…

या रात्रीनंतर हे दोघे भेटतात ते सात वर्षानी…

काय घडते या मधल्या सात वर्षात ..हे जाणून घेण्यासाठी..हे नाटक एकदा पहाच…

NO COMMENTS

LEAVE A REPLY