MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – “स्त्री”

0
4322

MarathiBoli Competition 2016 – Marathi Kavita – “स्त्री” 

marathi-kavita

स्त्री

मुलगी, बायको, सून, आई, सासू आणि आजी,
अशा ना-ना प्रकारच्या भूमिका एकाच जन्मात निभावणारी,
ती स्त्री…

मुलगी असताना आई-वडिलांसाठी,
बायकोच्या भूमिकेत शिरल्यावर नवऱ्यासाठी,
सून म्हणल्यावर अर्थातच सासू-सासर्यांसाठी,
आई झाल्यावर मुलांसाठी,
सासू झाल्यावर मग जावयासाठी असो नाहीतर सुनेसाठी, आणि
आजी झाल्यावर नातवंडांसाठी,
सर्वतोपरी झटणारी, आणि क्षणोक्षणीचा आधार असणारी,
ती स्त्री…

वेळोवेळी आपलं अस्तित्त्व सिद्ध करणारी,
आणि गरज पडेल तेव्हा स्वतःच अस्तित्त्व पणाला लावणारी,
ती स्त्री…

चूल आणि मूल, रूढी-परंपरा, संस्कृती हे सगळं जपणारी, आणि
त्यातूनही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी,
ती स्त्री…

आपलं घर सोडून परक्याच्या घरी जाणारी,
आणि त्या घराला आपलंस करून घेणारी,
ती स्त्री…

घरासाठी सतत आपलं आयुष्य वेचणारी,
आणि जन्मापासून मृत्यूपर्यंत सतत निरपेक्ष प्रेम करत राहणारी,
ती स्त्री…

आई-वडिलांना आयुष्यभर जपणाऱ्या,
नवऱ्याची अर्धांगिनी असणाऱ्या,
सासू-सासऱ्यांच्या मान ठेवणाऱ्या,
मुलांसाठी स्वतःच्या इच्छा पणाला लावणाऱ्या,
आणि नातवंडांना दुधावरची साय म्हणणाऱ्या,
अशा घराला घरपण देणाऱ्या,
त्या समस्त स्त्री वर्गाला माझा शतशः प्रणाम..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here