कविता न लिहिलेली – Marathi Kavita – Kavita Na Lihileli

0
1097

Marathi-kavita-kavita-na-lihileli

कविता न लिहिलेली – Marathi Kavita – Kavita Na Lihileli

कवयित्री : सोनाली वाळवेकर – शेटे
संपर्क: sonaliwalvekar9@gmail.com

फडफडणारे
कागद कवितांचे
ऐक त्यातील
प्रत्येक स्पंदन

प्रत्येक कागद वेगळा
तशी प्रत्येक कविता
फडफड निराळी
त्यातील सूर निराळे

एक कविता लिहिलीच नाही
तरी तिची सळसळ
खोलवर रूजलेली ..

ऐकलीस का ती ??

सोड ..

जिथे बोललेले शब्दच
विरतात हवेत
तिथे न लिहिलेल्या
चार ओळींचे कौतुक कसले ??

तू ऐक अथवा
नकोच ऐकूस
माझी विराणी
कधीच न लिहिलेली

हिशोब पूर्ण होतात खरे
एकाकीपणातच  सारे…

अपूर्णत्वाचा शाप
नाहीच  भावनांना
उमगेल
कधी तरी
तुलाही

कवितांच्या
कोऱ्या पानांत
न लिहिलेली
एक कविता
मात्र
चिंब भिजलेली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here