Marathi Kavita – जगणेच राहून गेले…

0
2380

Marathi Kavita – जगणेच राहून गेले…

marathi-kavita

अचानक तुझे जाणे आता छळू लागले
एकट्यात चांदणेही आता पोळू लागले

हूस्न की बाजार में किस्से हजार पाहीले
देवालाही येथे पदर पसरून लाचार पाहीले

जेथे विश्वासानेच विश्वासाचा घात केले
कुठे मागणार दाद,  जेव्हा कुंपणानेच शेत खाले

तू  नसतांनाही तुझे असणे मी शोधत गेलो
तुझा आठवणीत रडणे आता गजल झाले

खुले आम चोर चोरी करून फरार झाले
तो मी नव्हे?  पुरावे देण्यातच सारे जीवन गेले

परत येशिल का?  आरे झाले ते होऊन गेले
जगासेबत चालताना जगणेच राहून गेले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here