Marathi Book – He Sarv Aplayla Kothe Nenar – हे सर्व आपल्याला कोठे नेणार ?

0
2079

“Where Will All This Take Us ?”  या अरुण शौरी लिखित सुप्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद “हे सर्व आपल्याला कोठे नेणार ?”..

अरुण शौरींचे देशापुढील प्रश्नांवरील ‘इंडियन एक्सप्रेस ‘ मधील लिखाण पुरव्यांनी भरलेले, परखड, भविष्यासूचक असे आहे : प्रशासनाचा अभाव व त्याचा अंतर्गत सुरक्षेवरील परिणाम; पाकिस्तानातील घडामोडी त्यामुळे आपल्याला मिळालेला शह; चीनच्या कामगिरीचा आपल्यावरील परिणाम आणि त्यांच्याशी सामना करण्यासाठी आपण काय केले पाहिजे; आण्विक कराराच्या माध्यमातून सध्याच्या सरकारने आपली सुरक्षा आणि अमेरिकेबरोबरचे संबंध ह्या दोन्ही बाबतीत काशी समस्या निर्माण करून ठेवली आहे;

सुधारणांची गरज आणि त्यांना अडथळा करणारे डावे व इतरांची खरी पार्श्वभूमी; शौरीविरुद्ध जाहीर केलेली सीबीआय चौकशी आणि कॉंग्रेस सरकारविरुद्ध करायला हवी होती, पण जी केंद्र सरकारने दडपून टाकली ती चौकशी ; अर्थ संकल्पांमधील खोटेपणा  – अर्थ संकल्पांना उदयोगपतींनी १० पैकी ९ गुण दिले ते;

प्रसारमध्यमांमध्ये प्रसिद्ध केलेल्या आपल्या गैरकृत्यांना  सत्ताधारी काशी हुलकावणी देतात आणि तसे करूनच ते कसे कचाट्यात सापडतात; त्यांच्या प्रतिक्रिया – लपवा छपवी करणे, ढाली सारखा वापर करणे – गांधीजींच्या प्रतिक्रियांच्या कशा विरुद्ध असतात आणि त्याचे परिणाम कसे होतात ; आज आदर्शवाद हाच व्यवहारी राजकारणाचा मार्ग असण्याची कारणे; डावे पक्ष त्यांना गैरसोयीच्या वाटणार्‍या गोष्टी गदारोळ करून कशा गाडून टाकतात; इंदु संस्कृती व इस्लामी मूलतत्ववाद यांच्यातील महत्वाची साम्य आणि महत्वाचे फरक; नवी पत्रकारिता आणि तिच्यामुळे देशाचे हित कसे धोक्यात येत आहे ..

सद्यस्थितीत वाचलेच पाहिजे; अर्थात देशाला वाचवण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक..

He Sarv Aplayla Kothe Nenar – हे सर्व आपल्याला कोठे नेणार ?

हे पुस्तक सवलतीच्या दरात विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा..

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here