Google Adsense मधून अधिक उत्पन्न कसे मिळवाल.

7
2604

Google Adsense म्हणजे काय हे आपण या आधीच्या भागामध्ये पहिले आहे..

आता Google adsense च्या माध्यमातून अधिक उत्पन्न कसे मिळवायचे ते पाहू..

Google Adsense
Google Adsense
गूगल च्या माध्यमातून उत्पन्न मिळवणे हे काही फार कठीण काम नाही, यासाठी महत्वाचे काही लागत असेल तर ते म्हणजे “संयम”. ब्लॉग लिहिण्यास सुरुवात केल्या केल्या उत्पन्न सुरू व्हावे असि आपली अपेक्षा असेल तर Google Adsense त्यासाठी नाही. गुगल च्या माध्यमातून कामावण्यासाठी खाली काही टिप्स देत आहे..

१. Keyword Density :-  Keyword म्हणजे असा शब्द, जो आपल्या पोस्ट ला एका शब्दात सूचित करतो. जर एखाद्यानी हा Keyword गुगल मध्ये शोधला तर आपले पेज तिथे दिसावे यासाठी असलेला शब्द म्हणजे Keyword. याच Keyword वर आधारित जाहिराती गुगल आपल्या पेज वर पाठवते. अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी अधिक लोक आपल्या पेज वर आली पाहिजेत. यासाठी keyword खूप महत्वाचा ठरतो, Keyword चा पोस्टमध्ये अधिकाधिक वापर जास्त गरजेचा असतो. यालाच केयवोर्द डेन्सिटि म्हणतात.

२. आपले काही पोस्ट हे फक्त काही जाहिरातींसाठी लिहावेत, जेणेकरून सर्वाधिक वाचक या पोस्ट वर येतील, तर काही पोस्ट हे Keyword वर आधारित लिहावेत.

३. विषयावर आधारित पोस्ट लिहावीत, ज्यामुळे योग्य त्याच जाहिराती पेज वर दिसतील. वाचकांना परत परत आपल्या पेज वर बोलावण्यासाठी लेखांची मालिका लिहावी.

४. आपल्या संकेतस्थळावरील पानांची संख्या वाढवावी, २ दिवसातून एकदा तरी एखादा लेख लिहावा.. जेवढी जास्त पानांची संख्या तेवढी आपल्या संकेतस्थळावर येणार्‍यांची संख्या जास्त..

५. Google Adsense मधून योग्य अश्या जाहिराती निवडाव्यात, ज्या आपल्या संकेतस्थळाच्या रंगाशी समरस होतील. योग्य जाहिराती सर्वाधिक उत्पन्न देतात.

६. सर्वात महत्वाचे उत्पन्ना कडे न बघता , लेख लिहीत राहावे , संयम ठेवावा, आपल्याला याचा फायदा नक्की होईल.. आणि लेख हे फक्त जाहिरातींसाठी लिहू नयेत. काहीउपयोगी लेख लिहिले की त्यावर वाचक पण येतात आणि त्याद्वारे उत्पन्न पण मिळते..

 

7 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here