Facebook – फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती

1
1830

FACEBOOK – फेसबुक वरील व्यक्ती तितक्या प्रवूत्ती

Facebook

१. फेसबुक कोंबडा : यांना वाटते कि रोज सकाळी ,”गुड मॉर्निंग”ची पोस्ट टाकावी आणि लोकांना गुड मॉर्निंग म्हणायला भाग पाडावे.

२. फेसबुक सेलीब्रीटी : हे फेसबुक ने दिलेली ५००० ची लिमिट पूर्ण वापरतात आणि खूप सारे अनोळखी लोकाना अड्ड करत सुटतात.

मराठीबोली च्या संपर्कात राहण्यासाठी आपला इमेल आयडी द्यावा:

३. फेसबुक बाबा : हे फक्त देवाच्या पोस्ट टाकणार आणि प्रवचन करत सुटणार .

४. फेसबुक चोर : हे लोक दुसऱ्यांचे स्टेटस किवा पोस्ट चोरी करून , पटकन आपल्या नावावर टाकतात.

५ . फेसबुक देवदास : हे लोक नेहमी वेदनामय आणि निराशेच्या पोस्ट आणि कविता टाकतात. आणि आपले दुख जगाला दाखवून लोकांना पण दुखी करतात.

६. फेसबुक न्युज रीडर : जागत काय चालू , ह्या न्युज हे त्यांच्या स्टेटस मध्ये टाकून लोकांना न्युज सांगत सुटतात.

७. फेसबुक टीकाकार : हे स्वता तर कधी पोस्ट करणार नाही, पण दुसऱ्याच्या चांगल्या पोस्ट जावून टीका करत सुटतात. जसे पोस्ट जुनी आहे, पोस्ट जमली नाही वगैरे वगैरे.

८. फेसबुक विदुषक : हे लोक त्यांच्या आयुष्यात किती पण दुख असले तरी सर्वांना कमेंट आणि पोस्ट मधून हसवत असतात.

९. फेसबुक लाईकर : हे लोक गुपचूप पोस्ट वाचून लाईक करतात. पण कॉमेंट करायला कधी येत नाही.

१०. फेसबुक कॉमेंटर : यांना कोणती पण पोस्ट असो पण आपण कॉमेंट मारली पाहिजे असे वाटत असते. आणि कमेंट मास्तर असतात.

११. फेसबुक विचारक : हे लोक चांगले चागले विचार आपल्या पोस्ट मधून लोकापर्यंत पोहचवण्याच प्रयत्न करतात.

१२. फेसबुक कवी आणि कवियित्री : याना कविता सोडून काहीच जमत नाही. हे कविता टाकून लोकांना बोर करत असतात.

१३. फेसबुक टपोरी : हे लोक फेसबुक वर येतातच मुली पटवायला. दिसली मुलगी कि उठ सुठ फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत असतात. आणि कॉमेंट करत असतात. आणि मुलींच्या मागे लागतात.

१४. फेसबुक द्वेषी : ह्या लोकांना फेसबुक वर कोणाचीच प्रशंसा करणे जमत नाही. हे फक्त लोकानाचा द्वेष करतात आणि दुसर्या लोकांना त्रास देतात.

१५. फेसबुक च्याटर : यांना फेसबुक वर च्याट शिवाय काहीच सुचत नाही आणि जमत पण नाही,

१६. फेसबुक भिकारी : या लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट ब्लॉक असते म्हणून उठ सुठ मला अड्ड करा म्हणून लोकांना भिक मागत फिरत असतात.

१७ . फेसबुक लिंग परिवर्तक : हे लोक वेगळ्या लिंगाचे प्रोफाईल काढून फिरत असतात. मुल मुलीचे प्रोफाईल काढतात आणि मुली मुलाचे प्रोफाईल काढतात.

१८. फेसबुक खेळाडू : हे लोक दिवसभर फेसबुक वर गेम्स खेळत बसतात.

१९. फेसबुक माकड : हे कॉमेंट मध्ये काहीच बोलत नाही फक्त हा हा …….. हि हि करत असतात.

२० . फेसबुक कलेक्टर : हे फक्त फेसबुक वर पेज आणि ग्रुप जॉईन करतात पण कधी पोस्ट किवा कॉमेंट करत नाहीत. तर फक्त ग्रुप आणि पेज कलेक्ट करत असतात.

तुम्ही यातील कोणत्या वर्गात मोडता…..?

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here