BP Marathi Movie : बालक पालक आणि मी..

3
3790

BP Marathi Movie : बालक पालक आणि मी..

bp balak palak marathi movie

दोन आठवड्यांपूर्वीच बालक पालक म्हणजेच बीपी पाहिला..तेव्हापासूनच या विषयावर लिहावसे वाटत होते पण हिम्मत होत नव्हती..

मी माझ्या मित्रांबरोबर हा चित्रपट पाहायला गेलो होतो..

चित्रपटाच्या शॉर्टफॉर्म ला साजेसा असा चित्रपट…

आम्ही बीपी खूप एंजॉय केला…आणि पहिल्यांदा फेसबुक वर बीपी बघितल्याचे अपडेट केले…आणि इतरांना तो पहायचे आव्हाहन…

कारण चित्रपट मला खूप आवडला होता….अगदी आपला वाटला होता…

घरी चित्रपट खूप चांगला आहे एवढेच संगितले…कारण आज पण घरातील वातावरण एवढे काही मोकळे नाही आहे…

म्हणजे आज पण मला अश्या विषयावर आई किंवा बाबांशी बोलता नाही येत..किंवा नाही येणार…

पण रात्री झोपताना पुन्हा एकदा बीपी डोळ्या समोर आला…

त्यातील घटना मी माझ्या भूतकाळात शोधायला लागलो…

आणि त्या गुगल पेक्षाही वेगाने माझ्या समोर यायला लागल्या…अगदी आत्ताच्या वाटायला लागल्या…

मी माझ्या आयुष्यातील ‘विशु’ शोधायला लागलो…आणि तोही लगेजच सापडला…

Vishu in balak palak

माझाच एक वर्ग मित्र.. तेव्हा शाळा झाल्यानंतर आमचा ‘अ’ वर्गातील मुलांसाठी संध्याकाळी एक विशेष वर्ग मूल्य शिक्षणासाठी भरायचा.. काही शिक्षकांनी मिळून तो सुरू केला होता..

सुरुवात तर खूप चांगली होती…प्रार्थना नंतर विशेष एका मुद्यावर व्याख्यान  अजून बरेच काही…

एके दिवशी घरी जाताजाता…मित्रान मध्ये वेगळीच चर्चा कानावर आली..

काही समजत नव्हते… मित्र पण सुरूवातीला काहीच संगत नव्हते कारण ते मला हुशार मुलांमध्ये गणत होते…

पण जस जसा मी जास्त विचारणी करू लागलो..तेव्हा कोणालाही न सांगण्याच्या बोलीवर माझ्या हातात एक पुस्तक पडले…

अगदी तसेच जसे बीपी मध्ये ..

bp-balak-palak

फरक एवढाच की माझ्या हातात पडलेले पुस्तक हे गोष्टींचे पुस्तक नव्हते.. ते पुस्तक चित्रांचे होते…

पहिल्यांदाच असे काही पाहत होतो..

काय वाटले ते नाही सांगता येत… पण एवढे मात्र नक्की.. की नवीन नवीन पुस्तके बघण्याची हाव निर्माण झाली…

मग मीही त्याच ग्रुपचा एक हिस्सा झालो.. पण ही पुस्तके घरी तर नाही नेऊ शकत..मग ठेवायची कुठे…

शाळेतून घरी जाण्याच्या रोड वर एका इमारतीमधील ग्राऊंडफ्लोर वरील घर रिकामे होते… मग आम्ही ही पुस्तके त्याच्या बाल्कनी मध्ये लपवण्याचा निर्णय घेतला..

मग तोच बीपी मधील पाइपचा खेळ सुरू झाला..

जवळ जवळ एक दोन महीने तरी हा खेळ असाच चालू होता…

मधेच शाळेतील ‘क’ वर्गातिल १०-१२ मुलांना शिक्षकांनी खूप मारल्याचे समजले..

का ते काही माहीत नव्हते..

पण काही दिवसांनी एका ‘क’ वर्गातील मुलाकडून सगळा प्रकार समजला..

 

[box_light]

जशी आम्ही पुस्तके पहायचो तसे ते देखील… वर्गात असेच एके दिवशी छोट्या मधल्या सुट्टीमद्धे पुस्तकाचा रिले सूरु होता… म्हणजेच या हातातून त्या हातात.

तेव्हा आमच्या शाळेत दोनदा मधली सुट्टी व्हायची एकदा १० मिनिटांची आणि नंतर ३० मिनिटांची..

आम्ही या १० मिनिटातच डबा खाऊन घ्यायचो आणि मोठ्या सुट्टीत क्रिकेट खेळायचो..

त्या दिवशी त्यांच्या वर्गात तसेच झाले.. पण छोटी मधली सुट्टी संपता संपता शाळेतच हा पुस्तकाचा रिले सुरू होता…

रिले सुरू होण्या आधी सर्वांनी आपापले डबे खाल्ले.. पण आज नेहमीचा ग्रुप मधील एक जण डबा खायला नव्हता… तेव्हा त्याच्याच मित्रांनी त्याच्या दप्तरातून डबा काढून तो सुद्धा डबा फस्त केला…

त्यातील एकाच्या काय डोक्यात आले काय माहीत, त्यांनी हे पुस्तक त्याच डब्यात मधली सुट्टी संपता संपता लपवले…आणि डबा त्याच्याच बेंच खालील कप्यात ठेवला ..

सुट्टी संपल्यावर तास सुरू झाला, बाईनि शास्त्रं शिकवण्यास सुरुवात देखील केली.. अजून काही त्या डब्याचा मालक वर्गात आला नव्हता ..

पाचच मिनिटांनी तो खूप धावत धावत वर्गात आला… बहुदा तो घरी गेला असावा..

आल्यावर घाई घाईत जागेवर बसला.. दप्तरातून पुस्तके काढू लागला… आणि तेव्हाच त्याचा धक्का डब्याला लागला आणि डबा खाली पडला..

घरंगळत पुढे जाऊ लागला आणि नेमका पुढच्या बाकाच्या इथे जाऊन उघडला…

आणि बाहेर आले .. ते लपवलेले पुस्तकं… त्याला बिचार्‍याला तर याची कल्पना सुध्धा नव्हती…

बाईंच्या पायाशी पुस्तक पडले होते… बाई ते उभे राहूनच पाहत होत्या…

बाईंनी ते उचलले आणि लगेजच वर्गाच्या बाहेर गेल्या… आणि आत आल्या त्या आमच्या शाळेतिल पीटी च्या सराना घेऊन… लगेजच ज्याचा डबा होता त्याला बाहेर बोलावले…

बिचार्‍याला खूप मारले.. त्याला अर्थात हे पुस्तक त्याच्या डब्यात कसे आले हे माहीत नव्हते..

पण ते त्यानेही पाहिले होते.. खूप मार खाल्यावर त्याने पुस्तकाच्या मालकाचे नाव सांगितले..

मग कोणी कोणी पुस्तक पाहिले त्या सर्वांची नावे एक एक करून पुढे आली…

सर्वांची सार्वजनिक धुलाई करण्यात आली…सर्वाच्या पालकांना बोलवण्यात आले..

पण नंतर काय झाले ते त्या मुलांना आणि त्यांची पालकांनाच माहीत असेल…

आमचा मात्र पुस्तकाचा खेळ या घटनेने थांबवला..

 

[/box_light]
तेव्हाच गावात एक सायबर कॅफे सुरू झाला होता…इथे पण तोच मित्र ज्याने पहिल्यांदा माझ्या हातात पुस्तक दिले होते..

आता सायबर कॅफे मध्ये पहिल्यांदा जाऊन मी काय बघितले…हे सांगता सुद्धा येत नाही… पण अशी झाली माझ्या आयुष्यातील इंटरनेट ची सुरुवात..

विशेष म्हणजे तेव्हा मला गुगल देखील माहीत नव्हते…

पण सायबर कॅफे मध्ये गेल्यावर कुठे जाऊन काय बघायचे हे मनात पक्के बसले होते..

हा खेळ वाढतच गेला…मी तेव्हा दहवीत होतो.. वर्ग अर्धा सोडून आम्ही सायबर कॅफे मध्ये जायचो…

आज पण आठवून लाज वाटते… पण कदाचित त्या वेळेला हेच मान्य होते…

मग सायबर कॅफे चा हळू हळू कंटाळा येऊ लागला…

आणि मग मोर्चा निघाला तो विडियो पार्लर कडे…

balak palak

मित्रांनी सगळी व्यवस्था केली होती… त्याच्या घरी कोणीच नव्हते..आणि त्याचा स्वतचा सीडी प्लेयर सुद्धा होता..

व्हीसीडी कोणी आणलेली माहीत नाही…पण मी पहिल्यांदा बीपी पाहिला… खूप किळसवाणा वाटला… चित्रपटात जी चिऊ ची हालत झाली तशीच काही माझी..

त्या दिवसा नंतर, माझी नजरच बदलून गेली…  तीही अगदी माझ्या नकळत..

एक दोन आठवडे गेले… पुन्हा खबर मिळाली उद्या पुन्हा प्लान आहे… मला विचारण्यात आले..

का माहीत पण मी ही तयार झालो… आणि पुन्हा एकदा खेळ सुरू..

balak palak marathi movie

पुढे कॉलेज मध्ये सुद्धा तेच…

हा खेळ असाच सुरू… माझ्या मित्रांनी याला ‘स्वदेस पार्ट २’ असे नाव दिले होते.. कोणाला काही सीडी हवी असेल तर तो दूसर्‍याला विचारायचा… स्वदेस पार्ट २ आहे का?…

आजही खूप दिवसांनी मित्र भेटलो… नि बोलता बोलता विषय निघालाच तर स्वदेस पार्ट २ वर खूप हसतो..

बीपी आणि माझ्या आयुष्यात काही फरक असेल तर तो म्हणजे कदम काका…

माझ्या आयुष्यात कदम काका आले असते तर कदाचित सुरू झालेला हा खेळ एवढा लांबला नसता..

खरे तर प्रत्येक पालकांनी मुलांशी या विषयावर बोलले पाहिजे… कारण प्रत्येक जण या प्रश्नांची उत्तरे शोधतोच..मग त्याची बरोबर आणि योग्य मार्गाने उत्तरे मिळाली तर मुले चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत..

मुले काही स्वतहून बोलायची हिम्मत करत नाहीत…आणि जर केली तर पालकांकडून योग्य उत्तरे मिळत नाहीत..

balak palak marathi movie

मग ती अशी शोधली जातात..

[quote]या घटना ज्या भूतकाळात घडून गेल्या त्यांनी बालपण मात्र लवकर संपवले..[/quote]

balak palak marathi movie

संपूर्ण भूतकाळ डोळ्या समोर येऊन गेला… रवी जाधव यांचे खरेच धन्यवाद… त्यांनी हा विषय मराठी पालकांसमोर आणला…

आता मात्र डोळ्यावर खूप झोप येऊ लागली होती…

बीपी च्याच विचारात पुन्हा रंगलो..आणि कधी झोपलो ते कळलेच नाही…

 

3 COMMENTS

  1. चित्रपटाचा विषय वेगळा आहे अस म्हणून तो सामिक्षकचं कठीण करून ठेवतात. पण या चित्रपटाचा विषय वेगळा नसून माझा वाटतो. कारण प्रत्येकला हा विषय स्पर्श करून गेलेला आहेचं. विषय माझा जरी वाटत असला तरी तो भारतीय संस्कृतीला गंभीर वाटणारा आहे असा म्हणणारा वर्ग आहेच आपल्यात. पण काळाची गरज अस म्हणून हा चित्रपट पहायच निमित्त मला भेटल आणि धमाल आली….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here