Bharat Kadhi kadhi Maza Desh Aahe – भारत कधी कधी माझा देश आहे

3
11958

Bharat Kadhi kadhi Maza Desh Aahe – भारत कधी कधी माझा देश आहे

Bharat kadhi kadhi maza desh aahe
Bharat kadhi kadhi maza desh aahe

कालच सोनाली कुलकर्णी यांनी लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख वाचला…

त्यात त्यांनी रामदास फुटाणे यांच्या कवितेच्या ओळी दिल्या होत्या..

“भारत कधी कधी माझा देश आहे”
या ओळी वाचून तो लेख पूर्ण वाचला…तेव्हा त्या ओळींचा अर्थ समजला..
त्यापद्धल काही आज लिहित आहे..

“ती ही आपल्या सारखीच, खरे तर आपल्या मधलीच, तरुण मुलगी, आपण झोपतो तसे ती पण झोपली..पण झोपली ती कायमचीच..ती उठलीच नाही आणि आता उठणार पण नाही”

अश्या शब्दात सोनाली कुलकर्णी यांनी या लेखाची सुरुवात केली..

लेख होता.. पल्लवी पद्धल..समजले ना..अजून तरी आपण  कदाचित विसरलो नसू हे नाव..मेडिया २-३ दिवस दाखवते मग विसरून जाते..आपण पण ८-१० दिवस लक्ष्यात ठेवतो..मग आपण पण विषय सोडून देतो…

एका तरुणीचा..तिच्याच इमारतीच्या सुरक्षा रक्षकांनी .. फक्त वासनेपायी… खून केला…

वाचून पण चीड येते ना…मग विचार करा ..तिच्या घरच्यांचे काय झाले असेल..

काल टीव्ही वर एक अजून नवीन बातमी ऐकली..नाशिक मध्ये एका अल्पवयीन मुलीवर चालत्या गाडीत बलात्कार..

असे किती दिवस चालत राहणार..आणि किती दिवस अश्या बातम्या ऐकायला मिळणार..

बातम्या म्हटले की…एक तर भ्रष्टाचार, घोटाळा, खून, बलात्कार, दरोडा..नाहीतर कोणीतरी दोषी निर्दोष सुटले…

काय यासाठीच..क्रांतीकारकानी प्राणाचे बलिदान देऊन मिळवले होते स्वातंत्र्य..

आपले सरकार जोवर अश्या हरामखोरांना (माफ करा पण याहून चांगला शब्द नाही मिळाला) कडक शिक्षा करत नाही..

तोवर असेच चालत राहणार..

प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा ही झालीच पाहिजे…ती पण अशी..की ती शिक्षा बघून ..परत कोणी तसा गुन्हा करायची हिम्मत नाही करणार,..

जेव्हा असे होईल तेव्हा…खऱ्या भारताचे स्वप्न पूर्ण होईल…

तेव्हा अभिमानाने बोलता येईल “भारत माझा देश आहे”

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here