Marathi Movie Zapatalela 2 – झपाटलेला २ चित्रपट परीक्षण

0
Posted June 8, 2013 by swapnil samel in रोमांचक

Rating

कथा/पटकथा
 
 
 
 
 


दिग्दर्शन
 
 
 
 
 


संगीत/पार्श्वसंगीत
 
 
 
 
 


अभिनय
 
 
 
 
 


Total Score
 
 
 
 
 


निर्माता: वायाकोम १८ मराठी
 
दिग्दर्शक: महेश कोठारे
 
संगीत: अवधूत गुप्ते
 
कलाकार: आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपूरे, सई ताम्हणकर , महेश कोठारे , दीपक शिर्के , विजय चव्हाण, मधु कांबिकर, विशाखा सुभेदार, जितेंद्र जोशी
 
कथा कल्पना: महेश कोठारे
 
प्रदर्शन दिनांक: ७ जून २०१३
 
वर्ग:
 
निर्मिती:
 

का पाहावा?:

3डी तत्रज्ञान , ग्राफिक्स , आदिनाथ कोठारेचा अभिनय.
 

का पाहू नये?:

कथा, संवाद
 
थोडक्यात

Marathi Movie Zapatalela 2 – झपाटलेला २ चित्रपट परीक्षण महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला २ हा मराठीतील पहिला ३डी चित्रपट. झपाटलेला २ मध्ये आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपूरे, सई ताम्हणकर,  महेश कोठारे आणि तात्या विंचू यांच्या मुख्य भूमिका आहेत तर दीपक शिर्के , विजय चव्हाण, मधु कांबिकर, विशाखा सुभेदार यांच्या छोट्या पण मजेशीर भूमिका आहेत. […]

by Swapnil Samel
Full Article

Marathi Movie Zapatalela 2 – झपाटलेला २ चित्रपट परीक्षण

Zapatlela-2

महेश कोठारे दिग्दर्शित झपाटलेला २ हा मराठीतील पहिला ३डी चित्रपट.

झपाटलेला २ मध्ये आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपूरे, सई ताम्हणकर,  महेश कोठारे आणि तात्या विंचू यांच्या मुख्य भूमिका आहेत तर दीपक शिर्के , विजय चव्हाण, मधु कांबिकर, विशाखा सुभेदार यांच्या छोट्या पण मजेशीर भूमिका आहेत.

१९९३ साली प्रदर्शित झालेल्या झपाटलेला या चित्रपटच्या शेवटी इंस्पेक्टर महेश जाधव(महेश कोठारे) हे तात्या विंचू या बाहूल्याला त्याच्या भुवयांच्या मध्ये गोळी मारून ठार करतात तर त्याचा साथीदार खुबड्या खवीस याला पकडतात.

झपाटलेला २ ची सुरुवात २० वर्षां नंतर होते, खुबड्या खवीस तुरुंगातून पळून जातो, तात्या विंचू चा बाहुला मुंबईतील एका संग्रहालयातून पळवतो आणि बाबा चमत्कार कडे जातो. अश्या प्रकारची सुरुवात चित्रपटाची उत्सुखता वाढवते, तर ३डी तत्रज्ञान अप्रतिम.

झपाटलेला २ मध्ये काही २० वर्षां पूर्वीच्या कलाकारांना घेऊन चांगला परिणाम साधला आहे. सखाराम हवालदार झालेत इंस्पेक्टर सखाराम, तर इंस्पेक्टर महेश जाधव झाले आहेत कमिशनर महेश जाधव , लक्ष्याची आई आता तिच्या नातवाचा सांभाळ करताना दाखवली आहे.

चित्रपटाची सुरुवात लेखकांनी जेवढा विचार करून लिहिली आहे , तेवढाच विचार चित्रपटाच्या शेवटाचा झालेला नाही.

चित्रपटात एकही भीती दायक प्रसंग नाही. खरेतर ३डी तंत्रज्ञानाच्या मदतीने तात्या विंचुनी प्रेक्षकांना घाबरवणे अपेक्षित होते . पण असा एकही क्षण चित्रपटात येत नाही. तरी बाबा चमत्कारचे हाडूक, गोळेवाला आणि लावणीमध्ये सोडलेले विमान असे काही प्रसंग उत्तम.

zapatalela 2

झपाटलेला २ ला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिले आहे, चित्रपटातील ‘काळजात मुक्काम केला’ आणि ‘गजमुखा’ ही गाणी उत्तम पण ‘मदनिके’ हे गाणे थोडेसे फसले…

झपाटलेला २ मध्ये आदीनाथ कोठारे याचा अभिनय उत्तम, तर सोनाली कुलकर्णीची ३डी लावणी मस्तच , सई ताम्हणकर हिची फारच छोटी भूमिका. संवाद आणि विनोद महेश कोठारे पछडीतलेच.

चित्रपट थरारक वाटत नाही, तर तो विनोद निर्मितीही करत नाही…

चित्रपट सगळ्यात जास्त मार्क्स मिळवतो ते तंत्रज्ञानामध्ये एकदम १०० आऊट ऑफ १०० , तर मागे पडतो कथा आणि संवाद.

zapatalela 2

चित्रपटाचा शेवट खूपच घाईत झाल्यासारखा वाटतो.

आणि चित्रपट संपल्यावर लक्ष्याचा झपाटलेला आठवल्याशिवाय राहत नाही.

zapatalela 2

काही निगेटिव पॉइंट असले तरी मराठीतील पहिला ३डी सिनेमा झपाटलेला २ हा पाहण्यासारखाच आहे.

चित्रपट संपूर्ण मनोरंजन करतो.

मराठीबोली वरील लेख ईमेल द्वारे मिळवण्यासाठी ईमेल आयडी द्या.


About the Author

Swapnil Samel


0 CommentsBe the first to comment!


Leave a Response

(required)